बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiya 2) या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. छोट्या शहरातून आलेल्या कार्तिकने मुंबईसारख्या शहरात येऊन त्याआपली स्वप्ने पूर्ण केली आहेत. मात्र, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकची एकूण संपत्ती ३९ कोटी रुपये आहे. आपल्या अभिनयाने त्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिकने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत 'भूल भुलैया २', 'धमाका', 'पति पत्नी और वो', 'लुका छुपी','सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'प्यार का पंचनामा' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
कार्तिक मुंबईच्या वर्सोवा भागात कुटुंबासह राहतो. कार्तिक त्याच्या स्ट्रगलच्या काळात या घरात भाड्याने राहत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या घराची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. याशिवाय एका चित्रपटासाठी तो ५ ते ७ कोटी रुपये घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'भूल भुलैया २'च्या यशानंतर आता कार्तिकने त्याचे मानधन दुप्पट केले आहे.