चॉकलेटी लव्हर बॉय कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)ची आता नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘आऊटसाईडर’ कार्तिकने आता बड्या बड्यांना धक्का देत, बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज कार्तिक तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. त्याचे लाखो-करोडो चाहते आहेत. पण फक्त इतकंच नाही. कार्तिकचा इथपर्यंतचा स्ट्रगल मोठा आहे. सध्या कार्तिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कार्तिक ह्रतिक रोशनची चुलत बहीण पश्मीनला डेट करत असल्याचा बातम्या समोर येत आहे. सारा अली खाननंतर कार्तिकच्या आयुष्यात पश्मीनची एंट्री झाली. आता यावर कार्तिक आर्यनने मौनं सोडलं आहे.
झूमला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यन म्हणाला, "मला माहिती आहे की मी एक सेलिब्रेटी आहे आणि माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी सार्वजनिक होणार. माझी कोणाशी मैत्री झाली तर त्याला रिलेशनशीपचं लेबल लावलं जाईल. अशा गोष्टींचा अनेकवेळा दोन व्यक्तींना त्रास देतात. मी आता फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतोय."
सोशल मीडियाच्या पॉझिटिव्ह आणि निगेटीव्ह बाजूंबद्दल बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला की, माझ्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होते तेव्हा मला फरक पडतो. जेव्हा मी असे काही केले नाही, तरीही चर्चा होते त्यावेळी खूप विचार करतो. एखाद्या कलाकारचं आयुष्यात प्रायव्हसी असणं खूप अवघड असते.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कार्तिकचा ‘शहजादा’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. कार्तिकचा हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun ) ‘अला वैंकुंठपुरमुलू’ या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरमुलु’ हा सिनेमा 2020 साली रिलीज झाला होता. यात अल्लू व पूजा हेगडे लीड रोलमध्ये होते. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 260 कोटींची कमाई केली होती. याचाच हिंदी रिमेक ‘शहजादा’ नावाने रिलीज होतोय आणि यात कार्तिक व क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहेत. पुढील वर्षी 10 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.