करण जोहरसोबत (Karan Joha) वाजलं अन् कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) हातून ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) हा सिनेमा निसटला, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. जान्हवी कपूर आणि कार्तिकने ‘दोस्ताना 2’चं शूटींगही सुरू केलं होतं. पण मग अचानक सगळंच बिनसलं. करणने सोशल मीडियावर घोषणा करत, ‘दोस्ताना 2’मधून कार्तिक आर्यनची हकालपट्टी केल्याचं सांगितलं. कार्तिकवर अनप्रोफेशनल असल्याचा आरोपही त्याने केला. इतकंच नाही बॉक्स ऑफिसवर झिरो अन् फी मागतात करोडो..., असंही करणने कार्तिकचं नाव न घेता सुनावलं होतं. कार्तिक कधीच या वादावर उघडपणे बाेलला नाही. करणने रातोरात ‘दोस्ताना 2’मधून हकालपट्टी का केली? याचं उत्तर कधीच कार्तिकने दिलं नाही. पण रजत शर्मा यांच्या आपकी अदालत शोमध्ये कार्तिकने यावर चुप्पी तोडली.
कार्तिकने तुला त्याच्या सिनेमातून का काढलं? असा थेट प्रश्न रजत शर्मा यांनी कार्तिकला विचारला. यावर कार्तिक म्हणाला, सर, असं कधी कधी असं होतं. मी कधीच यावर बोललो नाही. माझ्या आईने मला शिकवलंय की, छोट्या मोठ्यांमध्ये काही वाद झाला तर छोटे बोलत नाहीत. मी हेच फॉलो करतोय. मी आजपर्यंत यावर बोललेलो नाही आणि नाही बोलणार.
ज्याला १.२५ लाख मिळायचे, तो २० कोटी मागतोय...ज्याला एका चित्रपटाचे १.२५ लाख मिळायचे, तो मला २० कोटी मागतोय...मी नकार दिला तर त्याने सिनेमा सोडला, असं करण जोहरने म्हटल्याचं रजत शर्मा सांगतात. हे ऐकून कार्तिक आर्यनही हैराण होतो. असं म्हटलं होतं त्यांनी...? असं तो हसत विचारतो. मला वाटतं या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. अनेकदा प्रश्नार्थक चिन्ह टाकून अशा बातम्या मीडियात येतात. सूत्रांच्या हवाल्याने काहीही छापलं जातं. निश्चितच मी लालची माणूस आहे, पण मी पैशांसाठी नाही तर चित्रपटांच्या स्क्रिप्टसाठी लालची आहे, असं तो म्हणतो.
म्हणजे तू स्क्रिप्टवर तू नाराज होतास आणि म्हणून ‘दोस्ताना 2’ सोडलास का? असं विचारल्यावर, तो म्हणाला, नाही... त्यावेळी कोरोना महामारी आली... दीड वर्षाचा ब्रेक आला. स्क्रीप्टमध्ये तसेही काही बदल केले जाणार होते, जे झाले नाहीत. अनेक गोष्टी होत्या....यावर रजत शर्मा कार्तिकची बाजू सांभाळतात. आम्ही तुझी अगतिकता समजू शकतो, तू करण जोहरबद्दल फार काही बोलू शकत नाहीस..., असं रजत शर्मा म्हणतात.
म्हणून ‘दोस्ताना2’मधून झाली होती हकालपट्टी?
कार्तिकला सिनेमातून काढल्यानंतर करण जोहर सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. कालांतराने करणने असं का केलं, याचं कारणही समोर आलं होतं. चर्चा खरी मानाल तर, कार्तिक आर्यनला गेल्या वर्षी लॉकडाउनच्या आधी 2-3- कोटी रुपये मानधनावर ‘दोस्ताना 2’ या चित्रपटासाठी साइन केलं होतं. नंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली आणि त्याने अधिक मानधनाची मागणी केली. कार्तिक आर्यनची ब्रँड व्हॅल्यू 10 कोटींवर गेली होती आणि त्यामुळे त्याने निर्मात्यांकडे ही मागणी केली. यावर करण जोहर अजिबात खूष नव्हता. याशिवाय कार्तिकच्या या अनप्रोफेशनल वागणुकीला घेऊन देखील तो नाराज होता. त्यामुळे त्याने थेट कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढले. एवढंच नाही तर कार्तिक आर्यनला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केलं.