Join us  

Shehzada Twitter Reaction: “सॉरी ब्रो, पण तू अल्लू अर्जुनच्या सिनेमाचं...”, कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चा टीझर पाहून भडकले फॅन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 5:01 PM

Shehzada Twitter Reaction: कार्तिकचा ‘शहजादा’ हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या ‘अला वैंकुंठपुरमुलू’ या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. आज ‘शहजादा’चा टीझर रिलीज झाला...

साऊथ सिनेमाचा रिमेक हा बॉलिवूडचा जुना फंडा. गेल्या काही महिन्यांतही बॉलिवूडने असे अनेक साऊथचे रिमेक बनवले. जर्सी, विक्रम वेधा, दृश्यम 2, बच्चन पांडे अशी एक ना अनेक नावं घेता येतील. यापैकी काहींनी चांगली कमाई केली. पण काही सुपर फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसलेत. आता कार्तिक आर्यनही ( Kartik Aaryan ) एका साऊथ सिनेमाचा रिमेक घेऊन येतोय. नाव आहे शहजादा (Shehzada).

कार्तिकचा हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun ) ‘अला वैंकुंठपुरमुलू’ या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे.आज ‘शहजादा’चा टीझर रिलीज झाला. 59 सेकंदाच्या या टीझरमध्ये कार्तिक फुल्ल अ‍ॅक्शन करताना दिसतोय. अनेकांना हा टीझर आवडलाये. पण काही मात्र हा टीझर पाहून भडकले आहेत. अनेकांनी कार्तिकची तुलना अल्लू अर्जुनसोबत करत, कार्तिकला ट्रोल केलं आहे.

अनेकांना कार्तिकचा अंदाज आवडला नाही. अनेकांनी त्याची अल्लू अर्जुनसोबत केली. सॉरी ब्रो, पण तू अल्लू अर्जुनची उंची गाठू शकत नाही, असं म्हणत अनेकांनी कार्तिकला ट्रोल केलं.

तुम्ही एका चांगल्या सिनेमाचा रिमेक बनवून वाटोळं का करत आहात? कार्तिक आर्यन अल्लू अर्जुनच्या 1 टक्काही देऊ श्कत नाही. अल्लू अर्जुनचा स्वॅग अन् स्टाईल मॅच करणं सोप्प नाही.., अशी कमेंट एका युजरने दिली.

 सॉरी कार्तिक, तूच काय पण कुणीच अल्लू अर्जुनला फाईट देऊ शकत नाही. टीझर खूपच कंटाळवाणा आहे. आणखी एक फ्लॉप रिमेक, असं एकाने लिहिलं.

अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरमुलु’ हा सिनेमा 2020 साली रिलीज झाला होता. यात अल्लू व पूजा हेगडे लीड रोलमध्ये होते. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 260 कोटींची कमाई केली होती. याचाच हिंदी रिमेक ‘शहजादा’ नावाने रिलीज होतोय आणि यात कार्तिक व क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहेत. पुढील वर्षी 10 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.

टॅग्स :कार्तिक आर्यनअल्लू अर्जुनबॉलिवूडट्विटरTollywood