Join us

अभिनेता कार्तिक आर्यनने शेअर केला 'दिल बेचारा'तील फेव्हरेट सीन, म्हणाला - दुसऱ्यांदा बघतोय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 12:46 PM

सुशांतच्या या शेवटच्या सिनेमाने सर्वांनाच रडवलं. आता या लिस्टमध्ये सुशांतचा आणखी एक फॅन  समोर आला आहे. तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' ने सगळेच रेकॉर्ड तोडले आहे. लोक पुन्हा पुन्हा हा सिनेमा बघून भावूक होत आहेत. या सिनेमाबाबत आधीच इतकी हवा झाली होती की, सिनेमा रिलीजच्या काही तासआधी सोशल मीडियावर ट्रेन्ड करू लागला होता. सुशांतच्या या शेवटच्या सिनेमाने सर्वांनाच रडवलं. आता या लिस्टमध्ये सुशांतचा आणखी एक फॅन  समोर आला आहे. तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन.

अभिनेता कार्तिक आर्यनला सुशांतचा 'दिल बेचारा' सिनेमा इतका आवडला की, त्याने एकदा सोडून दोनदा हा सिनेमा बघितला. त्याने स्वत:च याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली. कार्तिकने सिनेमातील बेस्ट सीनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

कार्तिकनुसार, दिल बेचारामध्ये जेव्हा आयुष्यातील शेवटचे दिवसचे मोजत असलेल्या मॅडीसमोर कीजी त्याची फ्यूनरल स्पीच देते, तो त्याचा फेव्हरेट सीन झाला आहे. या सीनमध्ये सुशांतचे एक्सप्रेशन पाहून सगळेच भावूक झाले होते. कार्तिकने याचा सीनचा फोटो शेअर केला आहे. फॅन्स सुद्धा कार्तिकच्या या पोस्टने भावूक झाले आहेत. 

दरम्यान, सुशांत हा त्याचा सिनेमा स्वत: प्रमोट करू शकला नव्हता. पण बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर सुशांतचा 'दिल बेचारा' प्रमोट केला. सर्वांनीच फॅन्सना हा सिनेमा बघण्याचं आवाहन केलं होतं. याचा परिणाम म्हणजे दिल बेचाराला २४ तास ९५ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. जर हा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज झाला असता तर कदाचित बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले गेले असते.

हे पण वाचा :

'सुशांत घेत होता संशयास्पद औषधं', जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

रियाने सुशांतकडून पैसे उकळले पण १५ कोटी नव्हेत; सीएचा खळबळजनक दावा

टॅग्स :कार्तिक आर्यनसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड