'द काश्मीर फाईल्स' चे निर्माता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री काही ना काही कारणाने सध्या चर्चेत आहेत. आता थेट त्यांनी दिल्लीउच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणात त्यांना माफी मागावी लागली. माफी मागितली असतानाही त्यांना दिल्लीउच्च न्यायालयासमोर १६ मार्च २०२३ रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. (Bhima Koregaon Case)
काय आहे नेमकं प्रकरण ?
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणात आरोपी गौतम नवलखा यांना २०१८ मध्ये दिलासा देण्यात आला होता. नवलखा यांचे हाऊस अरेस्ट आणि ट्रांजिट रिमांड रद्द करण्यात आला होता. हा आदेश देण्याऱ्या तत्कालीन न्यायाधीश मुरलीधर यांच्यावर विवेक अग्निहोत्री यांनी पक्षपात केल्याचा आरोप लावला. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये 'विवेक अग्निहोत्री', 'आनंद रंगनाथन' आणि 'स्वराज्य समाचार पोर्टल' यांच्यावर अवमानाची कारवाई सुरु केली होती. त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. नोटीस पाठवल्यानंतर आता अग्निहोत्री यांनी माफीनामा पाठवला. तसेच ट्विटही डिलीट केले. (Delhi High Court)
१६ मार्च ला वैयक्तितरित्या हजर राहावे लागणार
न्यायमुर्ती सिद्धार्थ मृदुल आणि तलवंत सिंह यांच्या खंडपीठाने यांनी विचार केला आणि सांगितले की ही कारवाई न्यायालयानेच सुरु केली होती त्यामुळे अन्निहोत्री यांना वैयक्तिकरित्या १६ मार्च रोजी उपस्थित राहावे लागेल. १६ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणी ला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
Kashmir Files IffI: 'सत्य नेहमी ...' विवेक अग्निहोत्रीचे इफ्फीच्या ज्युरींना सडेतोड उत्तर
विवेक अग्निहोत्रीने नेमके कोणते आरोप केले होते ?
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी गौतम नवलखा यांना दिलासा देणाऱ्या तत्कालीन न्यायाधीश एस मुरलीधर यांच्याविरोधात विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी मुरलीधर यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. इतकेच नाही तर त्यांचे एकमेकांशी संबंध आहेत, मुरलीधर यांची पत्नी नवलखा यांची मैत्रिण असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हणलं होतं.