Join us

काश्मिरी कलावंतांचे बॉलीवूडमध्ये योगदान

By admin | Published: February 17, 2016 2:10 AM

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या अभिषेक कपूर यांच्या फितूर चित्रपटात आदित्य रॉय कपूरच्या मोठ्या भावाची भूमिकेत एक देखणा काश्मिरी कलावंत नजरेस पडला. रईस मोईनुद्दीन असे त्याचे नाव

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या अभिषेक कपूर यांच्या फितूर चित्रपटात आदित्य रॉय कपूरच्या मोठ्या भावाची भूमिकेत एक देखणा काश्मिरी कलावंत नजरेस पडला. रईस मोईनुद्दीन असे त्याचे नाव. त्याच्या कामाचेही खूप कौतुक होते आहे. या चित्रपटात १२६ काश्मिरी कलावंतांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात कैटरिना कैफच्या पाकिस्तानी नियोजित वराची भूमिका करणारा अभिनेता राहुल भट्टसुद्धा मूळचा कश्मीरचाच आहे. राहुल, टीवी सीरियल हिना मधून खूप प्रसिद्ध झाला आहे. बॉलिवूड आणि काश्मिरी कलावंतांचे नाते जवळचे आणि जुने आहे. व्ही शांताराम यांचा चित्रपट ‘दो आंखे बारह हाथ’ चित्रपटात काम करणारे अभिनेता उल्हास (ज्यांचे खरे नाव मनमोहन कौल) होते. त्यांना पहिला काश्मिरी कलाकार मानले जाते, ज्यांनी हिंदी चित्रपटात काम केले.राजकुमारही काश्मीरचे होते. त्यांचे खरे नाव कुलभूषण राज पंडित होते. ते गुलबर्ग जवळील लोरालाई परिसरात जन्मले. नेपाळमध्ये शिक्षण घेतल्यावर राजकुमार मुंबईत आले. अनुपम खेरचाही प्रवास असाच आहे. खलनायकाची भूमिका करणारे जीवन (ज्यांचे खरे नाव ओंकारनाथ धर होते) ते कश्मीरची राजधानी श्रीनगरचे होते. कुणाल खेमू, टीव्ही कलाकार मोहित रैना, महेश भट्ट यांच्या पत्नी आणि आलिया भट्ट यांच्या आई सोनी राजदान, अभिनेता आणि निर्माता संजय सूरी, टीव्ही कलाकार इकबाल खान, राज जुत्शी, आमिर बशीर, मुजम्मिल इब्राहिम, टीव्ही स्टार हिना खान (‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम), तारिक धर, दानिश धर ज्यांनी चित्रपट ‘दिमाग का दही’ मध्ये काम केले आहे. सैफ अली खान यांचा चित्रपट ‘फैंटम’ मध्ये हाफिज सईदची भूमिका करणारे अभिनेता शाहनवाज प्रधान, जैयद भट्ट आदी घाटीतीलच कलाकार आहेत.