Join us

Kathal Trailer : हरवलेला फणस शोधण्याचा सान्या मल्होत्राचा मनोरंजक प्रवास, 'कटहल'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 19:31 IST

Kathal Movie :सान्या मल्होत्राचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कठहल'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

सान्या मल्होत्राचा बहुप्रतिक्षित चित्रपट कठहलचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. हरवलेला फणस (कठहल) शोधण्याची रंजक कथा कठहल चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा ग्रामीण भागातील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा ट्रेलर तुम्हाला एका मजेशीर रोलर कोस्टर राईडवर घेऊन जातो आणि जोपर्यंत तुमचे पोट दुखत नाही तोपर्यंत तुम्हाला हसवून जातो.

'कठहल' हा एक लहान शहरावर आधारित महिला लीड ड्रामा चित्रपट आहे, जो एका स्थानिक राजकारण्याभोवती फिरतो ज्याचे बहुमोल फणस गायब होते. त्याचा माग काढण्यासाठी एक तरुण पोलीस अधिकारी महिले (सान्या)ची निवड केली जाते, जी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे विचित्र प्रकरण सोडवायला निघते.

'कठहल' चित्रपटातून यशवर्धन मिश्रा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे, ज्याने ज्येष्ठ पुरस्कार विजेते लेखक अशोक मिश्रा यांच्यासोबत चित्रपटाचे सह-लेखन देखील केले आहे. 'कठहल' चित्रपटात सान्याशिवाय राजपाल यादव आणि विजय राज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

 सान्या मल्होत्राकडे कठल व्यतिरिक्त, सान्या मिसेस, सॅम बहादुर हे आगामी चित्रपट आहेत.
टॅग्स :सान्या मल्होत्रा