Join us  

याच वर्षी कॅटरिना विकी कौशलसह करणार लग्न ? या ठिकाणी करु शकतात डेस्टीनेश वेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 2:21 PM

कॅटरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून सलमान खानसोबत 'टायगर ३' सिनेमाचे शूटिंग करत आहेत. सिनेमाचे शूटिंग रुसमध्ये सुरु आहे.लाइफस्टाइ एशियाच्या रिपोर्टनुसार डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले आहे.

जितके कलाकरांचे फिल्मी करिअर गाजते तितकेच खासगी आयुष्यही गाजते. चाहत्यांनाही त्यांच्या विषयी जाणून घेण्यात फार रस असतो. त्यातचही   कलाकारांचे अफेअर, त्यांच्या लग्नाच्या बातम्या असतील तर अधिक त्याच्या चर्चा रंगतात. सध्या विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरत आहे. अजून तरी या दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही. त्याआधीच लग्नाच्या चर्चा रंगायला सुरुवात झाल्या आहेत. 

वर्षाअखेरीस हे कपल लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचे बोलले गेले होते. आता थेट लग्नाविषयी चर्चा रंगायला सुरुवात झाल्या आहेत. सोशल मीडियावर  दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. बातमी इतकी वेगाने पसरली की, विकी कौशलच्या वडिलांनीच त्यांचा साखरपुडा झाला नसून ही फक्त अफवा असल्याचे सांगितले होते.

कॅटरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून सलमान खानसोबत 'टायगर ३' सिनेमाचे शूटिंग करत आहेत. सिनेमाचे शूटिंग रुसमध्ये सुरु आहे.लाइफस्टाइ एशियाच्या रिपोर्टनुसार डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. हे लग्न डेस्टिनेश वेडिंग असणार आहे. उदयपुरमध्ये मोठ्या थाटात लग्न पार पडणार आहे.

 

यासाठी दोन्ही कुटुंबानी तयारीलाही सुरुवात केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. विकी आणि कॅटरिना दोघेही बॉलिवूडमध्ये सध्या फार बिझी आहेत. त्यामुळे साखरपुड्याची बातमी आली तेव्हा दोघांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. खासगी आयुष्यावर चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या फिल्मी करिअरवर चर्चा व्हावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कॅटरीना कैफ रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' मध्ये अक्षय कुमारसह झळकणार आहे. याव्यतिरिक्त इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'फोन भूत'मध्येही झळकणार आहे. सलमानसह 'टाइगर 3'चेही शूटिंग सुरु आहे. तर दुसरीकडे विक्की कौशलसुद्धा अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यामुळे दोघेही त्यांच्या कामात प्रचंड बिझी आहेत. त्यामुळे विकी कौशल आणि कॅटरिनाच्या लग्नाविषयी स्वतःहून माहिती देत नाही. तोपर्यंत लग्नाची बातमी कितपत विश्वास ठेवावा हे तर वेळच ठरवेल.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ