Join us

कतरिना कैफ अन् ऐश्वर्या राय सर्वात सुंदर कोण? सलमान खानचं उत्तर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 3:51 PM

ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्री आहेत.

ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्री आहेत. या दोन्ही अभिनेत्रींना बॉलिवूडचा दबंग खान सलमानने डेट केलं आहे. आजही कायम यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या असतात.  ऐश्वर्या आणि कतरिना कैफ यांच्यासोबत असलेलं भाईजानचं नातं चाहते विसरु शकलेले नाहीत. आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होताना दिसत आहे. 

सध्या सलमान खानचा 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमातील एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये करण जोहर सलमान खानला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. ऐश्वर्या आणि कतरिना दोघींमध्ये सर्वात जास्ट स्टनिंग अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न करण जोहरने केला. यावर एक क्षणही न दवडता सलमान ऐश्वर्या राय बच्चनचे नाव घेतो. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

ऐश्वर्या राय आणि सलमान हे 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात काम करताना एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र, काही वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झालं. यानंतर ऐश्वर्याचं अभिषेक बच्चनसोबत लग्न झालं.

यासोबतच सलमान आणि कतरिना यांचंही नात चर्चेत आलं होतं. पण, त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केली नाही.  कतरिनानं 2021 मध्ये विकी कौशलसोबत लग्न केलं. कतरिना आणि ऐश्वर्या दोघीही त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदात जगत आहेत. तर सलमान खान अजूनही अविवाहित आहे. 

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटीकरण जोहरसोशल मीडिया