Join us  

शॉकिंग! कतरिना कैफ व विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:25 PM

Vicky Katrina Death Threat: कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलिवूडचं पॉवर कपल. सध्या या लोकप्रिय कपलच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

Vicky Katrina Death Threat: कतरिना कैफ (Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal) हे बॉलिवूडचं पॉवर कपल. सध्या या लोकप्रिय कपलच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. या प्रकरणी मुंबईमधील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. कतरिना आणि विकीला नेमकी काय धमकी देण्यात आली आहे यासंदर्भातील माहिती सध्या उपलब्ध नाही. पण या प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचं  एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?मीडिया रिपोर्टनुसार, एक व्यक्ती दीर्घकाळापासून कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करत होता. विकी कौशलला याबाबत कळल्यावर, त्याने संबंधित व्यक्तिला समजवण्याचा प्रयत्न केल. पण तो जुमानला नाही. यानंतर त्याने कतरिना व विकी दोघांनाही धमकावणं सुरू केले. अखेर विकी व कतरिना दोघांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली. ‘अमल उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, कतरिनाला स्टॉक करणाºया व्यक्तिचं नाव आदित्य राजपूत आहे. या नावाची व्यक्ती फेसबुकवर उपलब्ध आहे. पण हे त्याचं खरं अकाऊंट आहे की नाही, याबद्दल अधिकृत माहिती नाही. 

कतरिना आणि विकी हे नुकतेच मालदीवला सुट्ट्यांसाठी गेले होते.  मालदीव व्हॅकेशनचे अनेक फोटो या कपलने सोशल मीडियावरुन शेअर केले होते.  काही आठवड्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रमाणे तुम्हालाही मारुन टाकू अशी धमकी सलमान आणि त्याच्या वडिलांना एका पत्राच्या माध्यमातून देण्यात आली होती. यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय.  

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूडमुंबई पोलीस