Join us

'या' एका अटीवर Katrina Kaif Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, काय ती वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 12:30 PM

तुम्हाला हे माहिती आहे का कतरिना (Katrina kaif ) लग्नासाठी तयार करणं इतकं सोप्पे नव्हते. कतरिनाने लग्नापूरर्वी विकीपुढे एक अट ठेवली होती. 

विकी कौशल (Vicky Kaushal)  आणि कतरिना कैफ (Katrina Kaif )यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते चांगलेच क्रेझी झाले आहेत. विकी व कतरिना गेल्या 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर काही तासांतच जोडप्याने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले होते. यानंतर या स्टार जोडप्याने हळदीचे फोटो शेअर केलेत आणि आज मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटो पोस्ट केलेत. सध्या हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का कतरिना लग्नासाठी तयार करणं इतकं सोप्पे नव्हते. कतरिनाने लग्नापूरर्वी विकीपुढे एक अट ठेवली होती. 

विकीला पसंत होती कतरिना बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफच्या  (Katrina Kaif ) एका जवळच्या मैत्रिणीने एका मुलाखतीत अभिनेत्रीच्या लग्नाशी संबंधित एक मजेदार गोष्ट सांगितली आहे. ती म्हणाला - हे सर्व अचानक घडले.त्यांची भेट, रोमान्स, लग्न, कतरिनासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर 2 महिन्यांनंतरच विकीला कळले की कतरिना ही एकमेव व्यक्ती आहे जिच्यासोबत तो संपूर्ण आयुष्य राहू शकतो. मात्र, कतरिनाला लग्नाबद्दल फारशी खात्री नव्हती. कतरिना तिच्या पहिल्या ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडू शकली नाही. मात्र तिला विकी आवडत होता, पण तिला अजून वेळ हवा होता.

विकीने असे तयार केलं कतरिनाला लग्नासाठी तयाररिपोर्टमध्ये पुढे, अभिनेत्रीने हो म्हणेपर्यंत विकी तिला लग्नासाठी तयार करत राहिला. पण कतरिनाने लग्नासाठी विकीसमोर एक खास अट ठेवली होती. कतरिनाने विकीला सांगितले की, तिची आई, बहिणी आणि संपूर्ण कुटुंबावर तिच्यावर करतो तसं प्रेम करावं लागेल. 

कतरिनाच्या बहिणी आणि भावासोबत विकीचे चांगले बॉन्डिंग आहे. त्यांच्यात चांगली मैत्री झाली आहे. हे पाहून कतरिनाही खूप खूश आहे. रिपोर्टनुसार, कतरिनाची भावंडं लग्नाआधी विकीला भेटलीही नव्हती. पण आता त्यांच्यातील बॉन्डिंग पाहून असे वाटते की जणू ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल