Join us

Katrina Kaif Video : अर्पिता खानची ईदनिमित्त पार्टी, पण कतरिना कैफच्या 'त्या' व्हिडिओचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 12:53 PM

अर्पिता खान आणि पती आयुष शर्मा यांच्या ईद पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) 2021 मध्ये विकी कौशलसह विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर काहीच दिवसात कॅटरिना गरोदर (Pregnant) असल्याच्या चर्चा सतत येत राहिल्या. काल ईद निमित्त कॅटरिनाने अर्पिता खानच्या (Arpita Khan) पार्टीत हजेरी लावली. यावेळी तिने कॅमेऱ्यासमोर पोज दिली असता पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या. एका व्हिडिओत कॅटरिना बेबी बंप लपवताना दिसत आहे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

अर्पिता खान आणि पती आयुष शर्मा यांच्या ईद पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी कॅटरिनाने अगदी सैल पंजाबी ड्रेस परिधान केला होता. या लुकमध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. मात्र ती सतत ओढणी सांभाळताना कॅमेऱ्यात कैद झाली. तर अनेक वेळा तिचा हात पोटावर होता. झालं तर मग नेटकऱ्यांना अंदाज बांधायला सुरुवात केली की कॅटरिना गरोदर आहे आणि बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तसंच कॅटरिना पार्टीत एकटीच आली होती. यामुळे 'विकी कुठे आहे?','काही बिनसलं का?' असे प्रश्न तिला कमेंट्स सेक्शनमध्ये विचारले गेले. त्यामुळे सध्या कॅटरिना जिथे जिथे जात आहे तिला प्रेग्नंसीवरुनच प्रश्न विचारले जात असल्याचं दिसून येतंय.

टॅग्स :कतरिना कैफईद ए मिलादअर्पिता खानप्रेग्नंसीसोशल मीडिया