Join us

Birthday Special : ‘त्या’ किसींग सीनसाठी दोन तास खोलीत बंद होती कतरीना कैफ; आजही होतो पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 8:00 AM

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिचा आज (16 जुलै) वाढदिवस. नमस्ते लंडन, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, एक था टायगर, टायगर जिंदा है, भारत अशा अनेक चित्रपटांतून अभिनय करत कतरीनाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले.

ठळक मुद्देबॉलिवूड व्यतिरिक्त कतरीनाने मल्याळम आणि तेलगू सिनेमात देखील अभिनेत्री म्हणून काम केले आहे

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिचा आज (16 जुलै) वाढदिवस.  नमस्ते लंडन, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, एक था टायगर, टायगर जिंदा है, भारत अशा अनेक चित्रपटांतून अभिनय करत कतरीनाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले.  2003 मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून कतरीनाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. पण हा चित्रपट फ्लॉप झाल्यापेक्षा या चित्रपटात एक सीन दिल्याचा पश्चाताप कॅटला आजही होतो. हा सीन कुठला तर, कतरीना आणि बॉलिवूडचे बॅड मॅन अशी ओळख असलेले अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या चुंबनाचा. 

‘बूम’  या चित्रपटातून कतरीना तिच्या करिअरला सुरुवात करणार होती. त्यामुळे तिला कुठल्याच प्रकारची चूक करायची नव्हती. चित्रपटात तिला बॅडमॅन गुलशन ग्रोवर यांच्यासोबत काही हॉट सीन्स द्यायचे होते. कॅट त्यासाठी पूर्णपणे तयार होती, परंतु  एका सीनमध्ये तर तिला गुलशन यांना  किस करायचा होता. या सीनला मात्र गुलशन आणि कॅट दोघेही नव्हर्स होते. या सीनसाठी त्यांनी ब-याचदा प्रयत्न केला. दिग्दर्शकांनी बरेचसे रिटेक घेतले परंतु, दिग्दर्शकांना अपेक्षित असलेला सीन दोघेही देऊ शकले नाहीत.  अखेर दिग्दर्शकांनीच कॅट व गुलशन या दोघांनाही एका रूममध्ये पाठविले आणि या सीनची प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिला. मग काय, दोघेही या सीनची प्रॅक्टिस करू लागले. कॅट आणि गुलशन दिग्दर्शकांना अपेक्षित असलेल्या सीन्सची प्रॅक्टिस करीत होते. अशात अचानकच महानायक अमिताभ बच्चन रूममध्ये आले. मग काय, कॅट आणि गुलशन यांची चांगलीच पंचाईत झाली. शिवाय अमिताभही या दोघांना अशा अवस्थेत बघून दंग राहिले. अखेर दिग्दर्शकांनीच या सर्व प्रकाराचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर उलगडा केला. दोन तासांच्या प्रॅक्टिसनंतर कॅट व गुलशन यांच्यातील तो किसींग सीन शूट झाला. पण कॅटला आजही त्या सीनचा पश्चाताप आहे.

कतरीनाच्या लहानपणी तिच्या आई आणि वडिलांचा घटस्फोट झाला होता. कतरीना आणि तिच्या भावडांना त्यांच्या आईने सांभाळले आणि शिकवले.  कतरीना कैफला सात भावंडे आहेत.  

  १४ वर्षांची असताना कतरीनाने एक ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकली आणि त्यानंतर कतरीना मॉडेलिंगच्या दुनियेत आली.  बॉलिवूड व्यतिरिक्त कतरीनाने मल्याळम आणि तेलगू सिनेमात देखील अभिनेत्री म्हणून काम केले आहे

टॅग्स :कतरिना कैफगुलशन ग्रोव्हर