Join us  

VIDEO : ऐन लग्नाच्या धावपळीतच ट्रॅफिक पोलिसाने अडवली कतरिनाची कार, यूजर्स म्हणाले - मुंह दिखाई केली असेल....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 12:28 PM

विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम ७ ते १० डिसेंबरपर्यंत चालणार  आहे.  कपल राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील सिक्स सेंट फोर्टमध्ये ९ डिसेंबरला लग्न करणार आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal)च्या लग्नाची फॅन्स  आतुरतेने वाट बघत आहेत. दोन्ही घरांमध्ये लग्नाची लगबग बघायला मिळत आहे. अशात कतरिना कैफचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ट्रॅफिक पोलीस तिची गाडी अडवताना दिसले. मात्र, काही वेळातच ट्रॅफिक पोलिसांनी तिच्या गाडी जाऊ सुद्धा दिलं.  हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक कतरिनाच्या लग्नावरून मजेदार कमेंट्स करत आहेत. 

ट्रॅफिक पोलिसाने अडवली कतरिनाची कार

व्हिडीओत बघू शकता की, कतरिना कैफची पांढऱ्या रंगाची कार रस्त्यावर थांबते. तेव्हाच ट्रॅफिक पोलीस त्यांच्या कारजवळ येतो आणि ड्रायव्हरसोबत काहीतरी बोलून त्याला कार पुढे नेण्याचा इशारा करतो. पण काळ्या काचांमुळे कतरिना दिसून येत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओवर फॅन्सच्या मजेदार कमेंट्स

कतरिना कैफच्या या व्हिडीओ लोक मजेदार कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, 'मुंह दिखाई? तर दुसऱ्याने लिहिलं की, मुळात त्याला कतरिनाला बघायचं होतं. एका यूजरने लिहिलं की, 'इन्शुरन्स नाहीये कारचा? तर एकाने लिहिलं की, लग्न कधी आहे  हे विचारायला आला असेल.

राजस्थानसाठी रवाना झाली कतरिना?

या व्हिडीओसोबत आणखीही काही व्हिडीओ कतरिनाच्या घराबाहेरचे समोर आले. यात बघून शकता की, काही कार्स उभ्या आहेत. आणि त्यात मोठाल्या बॅग्स ठेवल्या जात आहे. रिपोर्ट्सनुसार, ती तिच्या फॅमिलीसोबत आज राजस्थानला रवाना होणार आहे. विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम ७ ते १० डिसेंबरपर्यंत चालणार  आहे.  कपल राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील सिक्स सेंट फोर्टमध्ये ९ डिसेंबरला लग्न करणार आहे. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलसोशल मीडिया