Join us  

कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण, विकी कौशल म्हणाला, "ती प्रेरणादायी आणि फायटर आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 6:00 PM

Katrina Kaif : कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाने आपल्या मेहनती आणि दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाने आपल्या मेहनती आणि दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. कतरिना कैफने २००३ मध्‍ये बूममधून करिअरची सुरुवात केली होती. काही वर्षांनंतर २००५ मध्ये डेव्हिड धवनचा रोमँटिक कॉमेडी 'मैंने प्यार क्यों किया?' केला. या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. यानंतर तिच्या करिअरचा आलेख उंचावत गेला आणि तिने अनेक हिट चित्रपट दिले. कतरिना कैफ बॉलिवूडमध्ये २० वर्षांपासून काम करत आहे. अलीकडेच कतरिनाने इंडस्ट्रीत दोन दशके पूर्ण केल्यानंतर तिचा पती विकी कौशल(Vicky Kaushal)ने आपल्या भावना व्यक्त केल्या.

विकी कौशलने अलीकडेच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगितले आणि कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर हे सर्व कसे बदलले ते सांगितले. कतरिनाला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण केल्याबद्दल विचारले असता, मसान अभिनेत्याने सांगितले की ती त्याची प्रेरणा आहे. विकी म्हणाला, “मला वाटते की ती खूप प्रेरणादायी आहे. आता तिला मी एक व्यक्ती म्हणून ओळखतो आणि ती एक खरी फायटर आहे, विशेषत: जेव्हा गोष्टी तिच्या बाजूने काम करत नाहीत. तेव्हा ती त्या गोष्टींचा सामना करते. मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळते.”

विकी कौशलने कतरिनाला म्हटलं स्टारकतरिना कैफला स्टार म्हणत अभिनेता पुढे म्हणाला की, “माझी मानसिकता खूप वेगळी आहे. मी जास्त थंड प्रकारचा आहे. मी म्हणतो, 'आराम करा, ते होईल,' पण ती एखाद्या फायटरसारखी आहे. ती शांत बसत नाही. ती अडचणींचा सामना करते. गेल्या २० वर्षांत तिने स्वत:साठी जे काही साध्य केले आहे ते मला समजले आहे. ती कुठून आली आणि मग इथे राहून स्वतःला जुळवून घेणं हे अविश्वसनीय आहे. ती नक्कीच एक स्टार आहे.”

कतरिना कैफ आणि विकी कौशल वर्कफ्रंट..कतरिना कैफ अखेरची सुपरनॅचरल कॉमेडी फिल्म फोन भूतमध्ये मोठ्या पडद्यावर दिसली होती. आता ती लवकरच सलमान खानसोबत 'टायगर ३' आणि त्यानंतर अभिनेता विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस' या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तो लवकरच 'सॅम बहादूर'मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल