Join us  

Katrina Kaif : पुन्हा एकदा कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:58 PM

Katrina Kaif : कतरिना कैफ तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपवून मुंबईत परतली आहे. तिला विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

कतरिना कैफ (Katrina Kaif) तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपवून मुंबईत परतली आहे. तिला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. तिला ओव्हरसाईज कुर्त्यामध्ये दिसली तेव्हा प्रेग्नेंसीच्या अफवा उडू लागल्या. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. लवकरच विकीच्या घरात पाळणा हलणार असल्याचे चाहते सांगत आहेत.

कतरिना कैफ विमानतळावर एथनिक लूकमध्ये दिसली. तिने बेज रंगाचा कुर्ता घातला होता, सोबत केशरी रंगाची ओढणीही घेतली होती. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओंचा बोलबाला आहे. यासोबतच चाहते गरोदरपणाबद्दलही अंदाज लावत आहेत. कतरिनाला सैल कपड्यात पाहून चाहते म्हणत आहेत की कतरिना लवकरच तिच्या पहिल्या बाळाची आई होणार आहे.

कतरिना आणि विकी लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते. 'कॉफी विथ करण' या शोपासून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यांनी डेटिंगची बाब जगापासून लपवून ठेवली आणि त्यानंतर डिसेंबर २०२१ ला सात फेऱ्या मारून एकमेकांचा हात कायमचा धरला.

वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर कतरिना कैफ 'फोन भूत' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसली होती. यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता कतरिना सलमान खानसोबत 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे. तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत ती 'मेरी ख्रिसमस' चित्रपटात झळकणार आहे. विकी कौशलबद्दल सांगायचे तर, त्याचा 'गोविंदा मेरा नाम' हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्यासोबत कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकरही आहेत. याशिवाय विकीचा सारा अली खानसोबत एक चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण झाले आहे. तो 'सॅम बहादूर'मध्येही दिसणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल