गेल्या शुक्रवारी बॉलिवूडचे तीन सिनेमे रिलीज झालेत आणि पहिल्या दोनच दिवसांत या चित्रपटांनी बॉलिवूडची धाकधूक वाढवली. कतरिना कैफ ( Katrina Kaif ), सिद्धांत चतुर्वेदी व ईशान खट्टरचा ‘फोन भूत’ ( Phone Bhoot ) हा गेल्या शुक्रवारी रिलीज झालेला सर्वात मोठा सिनेमा आहे. याशिवाय जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) ‘मिली’ (Mili)आणि सोनाक्षी सिन्हा व हुमा कुरेशीचा ‘डबल एक्स एल’ (Double Xl) हे दोन सिनेमेही बॉक्स ऑफिसवर धडकले. पण सध्या या चित्रपटांची अवस्था वाईट आहे. याऊलट ‘कांतारा’ अजूनही गर्दी खेचतोय.
फोन भूत फूस्स...‘फोन भूत’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.05 कोटींचा बिझनेस केला होता. दुसऱ्या दिवशी कमाईत थोडी वाढ दिसली. शनिवारी दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.75 कोटींचा बिझनेस केला. म्हणजेच दोन दिवसांत या चित्रपटाने केवळ 4.80 कोटींचा बिझनेस केला.
जान्हवीच्या ‘मिली’ही आपटलाजान्हवी कपूरच्या ‘मिली’ हा सिनेमाही फ्लॉपच्या दिशेने पुढे जात आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटीही कमावू शकला नाही. या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी केवळ 50 लाख बिझनेस केला. काल शनिवारी हा आकडा 60 ते 70 लाखांवर पोहोचला. पण हा आकडा निराशाजनक आहे. हिट होणं हे जणू अशक्य वाटतंय.
डबल एक्स एलही फ्लॉपसोनाक्षी व हुमा कुरेशीचा ‘डबल एक्स एल’ला पहिल्या दिवशी 30 लाखांचा आकडाही पार करता आला नाही. दुसऱ्या दिवशीची कमाई सुद्धा 40 लाखांच्या खाली होती.
कांतारा सूसाटएकीकडे बॉलिवूडचे फोनभूत, मिली व डबल एक्स एल हे तिन्ही सिनेमे गर्दी खेचण्यात अपयशी ठरल्याचं चित्र असताना ‘कांतारा’ हा चित्रपट मात्र सूसाट धावतोय. ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनने तीन आठवड्यात 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. शुक्रवारी चौथ्या आठवड्यातही हा सिनेमा गर्दी खेचतोय. शुक्रवारी या चित्रपटाने 2.10 कोटी कमावले आणि शनिवारी आणखी मोठा धमाका केला. शनिवारी या चित्रपटाने 4.15 कोटींचा गल्ला जमवला. फोन भूत, मिली व डबल एक्स एल या तिन्हींनी मिळून केली नाही इतकी कमाई ‘कांतारा’ने केली. आता ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनची एकूण कमाई 57.90 कोटींवर पोहाचली आहे.