Join us

कॅटरिना कैफने ‘भारत’ मधील तिच्या भूमिकेविषयी म्हटले असे काही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:00 PM

‘भारत’ चित्रपटामधील कॅटच्या भूमिकेचे अनेक जणांकडून कौतुक केलं जातंय. तिच्या अगोदर ही भूमिका प्रियांका चोप्रा हिला आॅफर करण्यात आली होती. मात्र, तिने हा चित्रपट नाकारल्याने  ती भूमिका कॅटच्या पदरात पडली. 

बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ हिने एखादी भूमिका केली अन् त्याची चर्चा झाली नाही, असे होत नाही. आता हेच बघा ना, तिचा नुकताच रिलीज झालेला बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ सध्या बॉक्स ऑफिसवर  तुफान कमाई करत आहे. ५ जून म्हणजेच ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ तीन दिवसात १०० कोटींकडे यशस्वी घोडदौड केली आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसात बॉक्सऑफिसवर  भरघोस कमाई करणार आहे यात काही शंकाच नाही. आतापर्यंत सलमान कॅटरिनाच्या जोडीची जादू बऱ्याच चित्रपटांमधून अनुभवायला मिळाली आहे. ऑनस्क्रीनबरोबरच ऑफस्क्रीन सुद्धा त्यांची मैत्री तेवढीच खास आहे. ‘भारत’ चित्रपटामधील कॅटच्या भूमिकेचे अनेक जणांकडून कौतुक केलं जातंय. तिच्या अगोदर ही भूमिका प्रियांका चोप्रा हिला ऑफर करण्यात आली होती. मात्र, तिने हा चित्रपट नाकारल्याने  ती भूमिका कॅटच्या पदरात पडली. 

 कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘भारत’मधील तिच्या भूमिकेबद्दल तिने सांगितले आहे. ही व्यक्तिरेखा कॅटरिनाने कशी साकारली हे या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक अली अब्बास जफर व कॅटरिनाने सांगितले आहे. ही भूमिका तिच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे कॅटरिनाने व्हिडीओमध्ये सांगितले आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅटने लिहिले आहे की, ‘कुमुद रैना कायमच माझ्यासाठी खास असेल. हा अनुभव मी खूप मिस करणार आहे. ही भूमिका करतानाचा प्रत्येक क्षण मला आवडला आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी प्रत्येकानेच जीव ओतून मेहनत केली आहे. सेटवरील प्रत्येक दिवस खूप खास होता.’

या चित्रपटात दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. १९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साºयांमध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे.

टॅग्स :कतरिना कैफसलमान खानभारत सिनेमा