Join us  

विकी कौशलसोबत कतरिना कैफनं इकोनॉमी क्लासमधून केला प्रवास, नेटकरी म्हणाले - 'सलमानसोबत असतीस तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:58 PM

Katrina Kaif - Vicky Kaushal : विकी कौशल आणि कतरिना कैफचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ते दोघे इकोनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसले.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) मागील वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबेडीत अडकले आहेत. त्यानंतर या दोघांचं नाव बॉलिवूडच्या परफेक्ट कपलच्या यादीत सामील झाले आहे. हे पॉवर कपल जेव्हा एकत्र दिसते तेव्हा त्यांचे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. मात्र यावेळी असे झाले नाही. नुकतेच, कतरिना कैफ आणि विकी कौशल इकोनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसले. त्यादरम्यानचा त्यांचा फ्लाइटमधला व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून काही लोक त्यांचे कौतुक करत आहेत तर काही ट्रोल करत आहेत.

कतरिना कैफच्या फॅन क्लब पेजवरील एका व्हिडीओत कतरिना कैफ विकी कौशलसोबत इकोनॉमी क्लासमध्ये ट्रॅव्हल करताना दिसते आहे. या व्हिडीओत तिने काळ्या रंगाची हुडी आणि कॅप घातलेली दिसत आहे. त्यात ती खूप कूल दिसते आहे. याशिवाय तिने चेहरा मास्कने झाकला होता. तिच्या बाजूला विकी कौशल बसलेला असून तो ओवरसाइज स्वेटशर्टमध्ये खूप हॅण्डसम दिसत होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे. 

कतरिना कैफ आणि विकी कौशलचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत तर काही त्यांना ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले की, सलमान भाईसोबत राहिली असतीस तर प्रायव्हेट जेटमधून प्रवास केला असतास. तर आणखी एका युजरने म्हटले की, विमानात काळा चष्मा कोण घालतं. तर काही युजर्सनी डाउन टू अर्थ म्हटलं आहे.

वर्कफ्रंट...विकी कौशलचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. यात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय तो सॅम बहादूर, द इम्मोर्टल अश्वत्थामा आणि उधम सिंग या चित्रपटात झळकणार आहे. तर कतरिना कैफ सलमान खानचा बहुप्ततिक्षीत टायगर ३ चित्रपटात दिसणार आहे. 

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफसलमान खान