Join us  

नववधू कतरिना कैफच्या गळ्यातील मंगळसूत्रानं वेधलं साऱ्यांचं लक्ष, किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 12:40 PM

Katrina kaif vicky kaushal wedding :फोटोंमध्ये दिसत असलेल्या कतरिनाच्या (Katrina Kaif) गळ्यातील मंळसूत्राने चाहत्यांची मने जिंकली.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा लग्नसोहळा 9 डिसेंबरला संपन्न झाला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती या दोघांनी राजेशाही थाटात लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये हा लग्नसोहळा संपन्न झाला.  लग्नानंतर कॅट आणि विकीचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. काही क्षणातच या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले.ब्राइडल लूकमध्ये कतरिनाच्या चेहऱ्यावर एक वेगळचं तेज आले  होते. लाल लेहेंगा, केसात गजरा, हातात बांगड्या यामुळे कतरिनाच्या सौंदर्यात भर पडली होती.

फोटोंमध्ये दिसत असलेल्या कतरिनाच्या गळ्यातील मंळसूत्राने  चाहत्यांची मने जिंकली.फोटोमध्ये, कतरिना कैफने  (Katrina Kaif)  एक गोंडस छोटे मंगळसूत्र घातले आहे.फोटोंमध्ये, कतरिना कैफने हिऱ्याचे मंगळसूत्र घातलेले दिसते आहे, जे सब्यसाचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. विशेष म्हणजे काळ्या आणि सोन्याच्या मणींनी सजवलेल्या मंगळसूत्राला दोन छोटे हिरे जोडून एक वेगळा टच देण्यात आला आहे.बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार कतरिनाच्या मंगळसूत्राची किंमत पाच लाख रुपये आहे.  कतरिनाने लग्नात छोटे पण सुंदर मंगळसूत्र परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कतरिनाला तिच्या लग्नात सर्वात सुंदर आणि वेगळी दिसण्याची इच्छा होती. तसंच झालं. वेडिंग आउटफिटमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत होती.

विकी  (Vicky Kaushal) आणि कतरिनाच्या  (Katrina Kaif)  लग्नसोहळ्याची गेल्या आठवड्याभरापासून चर्चा होती. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. लग्नानंतर कॅट व विकी जुहूतील एका अलिशान फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहेत.  या नव्या घरात विकी व कतरिनाचा नवा संसार सुरू होणार आहे. विकी व कतरिनाने नवा फ्लॅट 60 महिन्यांसाठी भाड्यानं घेतला आहे. याच बिल्डिंगमध्ये अनुष्का व विराटचेही दोन फ्लोर आहेत. विकी व कॅटने नव्या फ्लॅटसाठी सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून 1.75 कोटींची रक्कम आणि 36 महिन्यांचं भाडं दिल्याचं कळतं. या घराचं भाडं 8 लाख रूपये महिना आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल