काळासोबत खूप काही बदलते. आता कतरीना कैफचेच बघा ना, एकेकाळी दीपिका पादुकोणच्या सावलीलाही उभी न राहणारी ही बया आता दीपिकासोबत काम करण्यास उतावीळ झाली आहे. होय, अलीकडे एका मुलाखतीत कॅटने आपली ही इच्छा बोलून दाखवली.तुला कुण्या अभिनेत्रीसोबत आयटम सॉन्ग करायला आवडेल, असा प्रश्न कॅटला विचारण्यात आला. यावर कॅटने एक क्षणही न घालवता दीपिकाचे नाव घेतले. मला दीपिकासोबत आयटम सॉन्ग करायला आवडेल, असे ती म्हणाली. तिने यामागचे कारणही सांगितले. दीपिका एक उत्कृष्ट डान्सर आहे. ती डान्स करते तेव्हा तिची स्टाईल इंटरेस्टिंग असते. ती खूप ग्रेसफुल दिसते, असे कॅट म्हणाली.
दीपिकासोबत काम करण्यास उत्सुक असलेली हीच कतरीना काही काळापूर्वी तिच्याकडे पाहणेही पसंत करायची नाही, हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. रणबीर कपूर आधी दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. याचदरम्यान रणबीरच्या आयुष्यात कतरीनाची एन्ट्री झाली आणि रणबीर व कतरीना एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागले. त्यानंतर कतरीना व दीपिकाच्या ‘कॅट फाईट’च्या चर्चा ऐकू येऊ लागल्या. या चर्चा खोट्याही नव्हत्या.
रणबीरमुळे कतरीना व दीपिका एकमेकींसोबत बोलणे दूर पण एकमेकींकडे पाहणेही पसंत करेनात. पण पुढे रणबीरने कतरीनालाही सोडले आणि तो आलिया भटच्या प्रेमात पडला. रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरीना अशी काही बदलली की, दीपिका तिला कधी नव्हे इतकी जवळची वाटू लागली. दीपिकाच्या रिसेप्शनला ती पोहोचली. आता तर दीपिकासोबत काम करायलाही ती तयार आहे. एकंदर काय तर, काळासोबत नात्याचे संदर्भ बदलतात, ते हेच.