ठळक मुद्देसध्या कॅटरिना सलमान खानसोबत ‘भारत’चे शूटींग करतेय. या चित्रपटात सलमान व कॅटशिवाय दिशा पाटनी, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर अशी दमदार स्टारकास्ट आहे.
कॅटरिना कैफ सध्या एकटेपणं नकोसे झाले आहे. तीन वर्षांपूर्वी कॅटचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाले आणि तेव्हापासून ती एकटी आहे. अर्थात ती आपल्या कामात बिझी आहे. पण आता कॅटला एकटे राहायचे नाही, असे जाणवू लागले आहे. हे आम्ही नाही तर खुद्द कॅटरिनाने म्हटले आहे.
एका ताज्या मुलाखतीत कॅटरिना तिच्या रिलेशनशिप स्टेटसवर बोलली. मी सध्या सिंगल आहे. पण आता हा सिंगल टॅग मला हटवायचा आहे, असे कॅटरिना म्हणाली. २०१९ मध्ये कोणती तीन कामे पूर्ण करायची आहेत? असा प्रश्न विचारला असता तिने हे उत्तर दिले. सध्या बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन सुरु आहेत. दुसरीकडे मी अद्यापही सिंगल आहे. यापुढे मला सिंगल राहायचे नाही. या वर्षांत एक फिल्मफेअर अवार्ड, एक बॉयफ्रेन्ड आणि स्वत:ची एक प्रॉडक्शन कंपनी मला हवी आहे. ही तीन कामे मी यावर्षात करू इच्छिते, असे तिने सांगितले. रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवरही ती खुलेपणाने बोलली. या ब्रेकअपनंतर आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे, असे तिने सांगितले.
आता या बदलेल्या दृष्टिकोनासह एक फिल्मफेअर अवार्ड, एक बॉयफ्रेन्ड आणि स्वत:ची एक प्रॉडक्शन कंपनी ही तीन कामे कॅटरिना कशी पूर्ण करते, तिला यात किती यश मिळते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.सध्या कॅटरिना सलमान खानसोबत ‘भारत’चे शूटींग करतेय. या चित्रपटात सलमान व कॅटशिवाय दिशा पाटनी, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर अशी दमदार स्टारकास्ट आहे. येत्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.