बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नानंतर त्यांचे काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच विकी आणि कतरिनाच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. लग्नाच्या एक महिन्याच्या वाढदिवसानिमित्त विकी आणि कतरिनाने एकमेकांना शुभेच्छा देणारे स्पेशल फोटो शेअर केले आहेत. तेव्हापासून चाहते या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ एकामागून एक शेअर करत आहेत. यामध्ये कतरिना कैफचा घरातील कामे करतानाचे व्हिडिओ आणि विकी कौशलचे लोणीसोबत पराठे खातानाचा फोटोदेखील व्हायरल होताना दिसत आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफचे सध्या नवीन आणि जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, कतरिना कैफने घरातील कामे करतानाचे सर्व फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामद्वारे चाहत्यांसह शेअर केले होते, जे तिचे चाहते आता शेअर करत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये कतरिना कैफ स्वयंपाकघरात भांडी धुताना, जेवण बनवताना आणि घर झाडताना दिसत आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे विकी आणि कतरिनाने सोशल मीडियावर एकमेकांना खास शुभेच्छा दिल्या.
या दोघांच्या लग्नाच्या बातम्या मागील महिन्यात खूप गाजल्या होत्या. हे लग्न राजस्थानच्या ७०० वर्षे जुन्या आलिशान पॅलेसमध्ये पार पडले.
अजूनही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर कतरिना कैफनं विकी कौशल सोबतचा रोमँटिक फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.