सलमान खान व कतरिना कैफ हे दोघे एका पार्टीत सोबत दिसत होते. ते विभक्त झाल्यानंतर कतरिनाचे नाव रणबीर कपूरसोबत तर सलमानचे नाव युलिया वेंटरसोबत जोडले जात आहे. सध्या कॅट व सलमान दोघांमध्ये कुठलीही रिलेशनशिप नाही. परंतु, त्यांची मैत्री अजूनही टिकून आहे. अलीकडेच कतरिनाने केलेल्या एका वक्तव्यामुळे त्या दोघांच्या संबंधाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ‘इंडस्ट्रीमध्ये असा कोण आहे, की त्याच्यासोबत असल्यावर तुला कुटुंबात असल्यासारखे वाटते,’ असा प्रश्न एका इव्हेंटमध्ये कतरिनाला विचारला गेला. यावर तिने कोणताही विचार न करता सलमान खानचे नाव सांगितले. सलमान सध्या कॅटच्या ‘बार बार देखो’चेही प्रमोशन करताना दिसतो आहे. सलमानच्या भावाचा ‘फ्रीकी अली’ व कतरिनाचा ‘बार बार देखो’ हे दोन्हीही चित्रपट नुकतेच रीलीज झालेत, तेही एकाच दिवशी.
कतरिनाला सलमान वाटतो कुटुंबासारखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2016 1:58 AM