- अनुज अलंकार
कट्टी बट्टी (हिंदी चित्रपट) दिग्दर्शक निखिल अडवाणी यांचा पहिला चित्रपट ‘कल हो ना हो’ ला प्रेक्षकांनी पसंत केले होते. जुन्याच कथानकावर बेतलेला त्यांच्या ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात आवर्जून सांगण्यासारखे असे काहीही नाही. पायल (कंगणा) आणि माधव ऊर्फ मॅडी (इमरान खान) यांची ही प्रेमकथा. दोघांची ओळख अहमदाबादेतील एका कॉलेजात होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागतात. पाच वर्षांनंतर दोघांतील संबंध एवढे विकोपाला पोहोचतात, की प्रकरण ताटातुटीपर्यंत येते. अशावेळी मॅडीला कळते, की कॅन्सर असल्यामुळे पायल दुरावा राखत आहे. तिचे आयुष्य काही महिन्याचे असल्याने मॅडी तिला हरप्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि एके दिवशी ती मॅडीपासून दूर जाते.उणिवा : कॅन्सरग्रस्त मुलीची प्रेमकथा दर्शकांना भावविवश करू शकली असती. कंगणासारख्या सक्षम अभिनेत्रीसाठी हे पात्र साकार करणे कठीण नव्हते; परंतु निखिल अडवाणी यांच्या दुबळ्या दिग्दर्शनामुळे सर्व भट्टी बिघडली. चित्रपटाचा शेवट होण्याच्या २० मिनिटे आधी हीरोइनला कॅन्सरग्रस्त करण्याचे भान दिग्दर्शकाला येते. चित्रपट भावनेच्या आहारी गेल्याने कथानकात समतोल राहत नाही. युवकांसाठी आणि लव्हस्टोरी म्हणून निखिल अडवाणी यांना काहीही विशेष करता आलेले नाही. कंगणाच्या भूमिकेला दुबळ्या दिग्दर्शनाचा फटाका बसला आहे. दुसरीकडे इमरान खानही छाप पाडण्यात अपयशी झाला आहे.गीत-संगीताच्या बाबतीही चित्रपट कालबाह्य आहे. प्रेक्षकांना आवडेल असे एकही गाणे नाही. पूवार्धाचा मूळ कथानकाशी मेळच बसत नाही. भावानांचा अतिरेक, तोच तोच प्रेमालाप असलेल्या अशा कथानकाचा शेवटही प्रेक्षकांना कळतो. निखिल अडवाणी दिग्दर्शक म्हणून पूर्ण अपयशी ठरले आहेत.का पाहवा ? पर्याय नसेल तर..का पाहू नये ? दुबळे दिग्दर्शन आणि जुने गुळगुळीत कथानकवैशिष्ट्ये : फारसे काही नाही. युवकांना भावतील असे महाविद्यालयीन जगतातील काही क्षण आणि कंगणाचे चाहते खूश होऊ शकतात.एकूणच अशा ‘कट्टी बट्टी’शी प्रेक्षकही लवकर कट्टी घेतील.