लोकांना कोट्यधीश करणाऱ्या केबीसीमध्ये बिग बींच्या कपड्यांवर खर्च होतात लाखो रुपये; एका कोटची किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 03:10 PM2022-07-18T15:10:49+5:302022-07-18T15:11:22+5:30

Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्या वॉर्डरोबवर साधारणपणे लाखो रुपये खर्च केले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांवर सर्वाधिक खर्च केला जातो.

kaun banega crorepati 14 unknown facts budget of amitabh bachchan wardrobe | लोकांना कोट्यधीश करणाऱ्या केबीसीमध्ये बिग बींच्या कपड्यांवर खर्च होतात लाखो रुपये; एका कोटची किंमत ऐकून व्हाल थक्क

लोकांना कोट्यधीश करणाऱ्या केबीसीमध्ये बिग बींच्या कपड्यांवर खर्च होतात लाखो रुपये; एका कोटची किंमत ऐकून व्हाल थक्क

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील तुफान लोकप्रिय असलेला 'कौन बनेगा करोडपती' (kaun banega crorepati) अर्थात केबीसीचं १४ वं पर्व लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे या नव्या सीजनसाठी बिग बींनी (Amitabh bachchan) त्यांच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या शोसंदर्भात अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यामध्येच आता या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन किती फी घेतात, त्यांच्या कपड्यांची किंमत काय या गोष्टींची चर्चा होताना दिसते.

'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालकअमिताभ बच्चन यांच्या वॉर्डरोबवर साधारणपणे लाखो रुपये खर्च केले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांवर सर्वाधिक खर्च केला जातो. प्रत्येक एपिसोडमध्ये बिग बी सूट-टाय, ब्रोच, पिन आणि स्कार्फ परिधान करुन परफेक्ट लूकमध्ये असतात. परंतु, हा लूक करण्यासाठी त्यांच्यावर १० लाखांचा खर्च केला जातो.

, बिग बींचा गेटअप करण्यासाठी लागणारे कपडे हे विदेशातून मागवले जातात. १३ व्या सीजनसाठी स्टायलिश प्रिया पाटीलने बिग बींचे कपडे डिझाइन केले होते. त्यामुळे या नव्या सीजनसाठी त्यांना स्टायलिश कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
 

Web Title: kaun banega crorepati 14 unknown facts budget of amitabh bachchan wardrobe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.