Join us

रामायणावर वादग्रस्त ट्विट करणा-या कविता कौशिकने आता या अभिनेत्रीशी घेतला पंगा, वाचा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 14:04 IST

कविता कौशिक अशी झाली होती ट्रोल...

‘स्वत: संसदेत बसून मोबाईलवर पॉर्न पाहातात आणि आम्हाला रामायण बघण्यास सांगतात’, असे वादग्रस्त ट्विट अलीकडे अभिनेत्री कविता कौशिकने केले होते. या ट्विटनंतर कविता प्रचंड ट्रोल झाली होती. आता कविताने अभिनेत्री पायल रोहतगीसोबत नवा पंगा घेतला आहे.रामायणाच्या पार्श्वभूमीवर कविता कौशिकने केलेल्या ट्विटनंतर अनेकजण तिच्यावर अक्षरश: तुटून पडलेत. पायल रोहतगी ही त्यापैकीच एक. तिने कविताला चांगलेच डिवचले. ‘टीव्हीची एक अभिनेत्री, जिच्याकडे काम नाहीये आणि त्यामुळे त्रासली आहे. एफआयआर सीरिअलमध्ये होती बिचारी, तिचे नाव काय?’ असे ट्विट पायलने केले. पायलचे हे ट्विट कविता कौशिकला असे काही झोंबले की, तिनेही पायलला जशात तसे उत्तर दिले.

‘पायल, माझे नाव घे. मी हा ब्रँड (एफआयआर मालिका) इतका स्ट्राँग बनवला की, माझ्या नावाशिवायही लोक मला ओळखतात. पण तुझे काय? ना तू उत्तम अभिनेत्री आहेस ना चांगली व्यक्ती. तुझ्याकडून फक्त द्वेष शिकता येऊ शकतो,’अशा शब्दांत कविता कौशिकने पायलला उत्तर दिले.

अशी झाली होती ट्रोल

‘स्वत: संसदेत बसून मोबाईलवर पॉर्न पाहातात आणि आम्हाला रामायण बघण्यास सांगतात’, या वादग्रस्त ट्विटनंतर अनेक युजर्सनी कविता कौशिकच्या अटकेची मागणी केली होती. रामायणाची अ‍ॅडल्ट फिल्मसोबत तुलना करणा-या कविता कौशिकला तात्काळ अटक करा, असे अनेक युजर्सनी म्हटले होते.  ‘आम्ही तुला रामायण बघायला सांगितलेले नाही. तू इतकीही मोठी नाहीस,’ अशा शब्दांत लोकांनी तिला सुनावले होते.

टॅग्स :कविता कौशिकपायल रोहतगीरामायण