KBC 14, Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सर्वोत्कृष्ट क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच खूप पसंत केला जातो. सध्या 'कौन बनेगा करोडपती'चा (Kaun Banega Crorepati) १४वा सीझन सुरू आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक स्पर्धकांनी ५० लाख रुपयांची रक्कम जिंकून दाखवली आहे. तर अनेकदा अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना अनेक स्पर्धकांना घाम फुटला आणि त्यांनी शो मध्येच सोडून जाणे पसंत केले. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सूरज दास हे हॉटसीटवर होते. ते प्रश्नांची अगदी सहज उत्तरे देत होते. २५ लाखांचा टप्पा त्यांनी ओलांडला, पण ५० लाखांच्या प्रश्नावर ते अडखळले आणि त्यांना मध्येच शो सोडावा लागला. नक्की काय होता तो प्रश्न, जाणून घेऊया.
काय होता तो कठीण वाटणारा प्रश्न?
खेळाच्या या टप्प्यावर येईपर्यंत सूरज यांनी आपल्या सर्व लाइफलाइन संपवल्या होत्या. त्यांना अचूक उत्तराबद्दल खात्रीही नव्हती. म्हणूनच त्यांनी २५ लाख जिंकून खेळ सोडला. महानायक अमिताभ बच्चन यांनी विचारलेला प्रश्न असा होता, "कोणता देश २४ नोव्हेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. ज्या दिवशी देशाच्या संस्थापकाने मुख्याध्यापक ही पदवी स्वीकारली होती." या प्रश्नासाठी त्यांना दिलेले पर्याय होते- A – पाकिस्तान, B – तुर्की, C – फ्रान्स आणि D – चीन.
हे आहे बरोबर उत्तर
या कठीण प्रश्नाचे उत्तर होते पर्याय B - 'टर्की'. २४ नोव्हेंबर १९२८ रोजी, मुस्तफा कमाल यांनी अधिकृतपणे मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या देशाच्या शाळांच्या मुख्य शिक्षकाची (मुख्याध्यापकाची) पदवी स्वीकारली होती.
सूरज यांना या प्रश्नाच्या उत्तराबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी २५ लाखांची जिंकलेली रक्कम घेऊन खेळ सोडणे पसंत केले. हा एपिसोड खूप मनोरंजक होता. यामध्ये स्पर्धक सूरज आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि चित्रपटांशी संबंधित अनेक गप्पाही मारल्या.