Kbc 14 : पापाराझीच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यावरही भडकतात जया बच्चन, बिग बींनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 10:17 AM2022-11-11T10:17:42+5:302022-11-11T10:19:58+5:30

Amitabh Bachchan : चित्रपटात आपल्या निष्पाप चेहऱ्यानं रिझवणाऱ्या जया बच्चन (Jaya Bachchan) रिअल लाईफमध्ये अतिशय तापट आहेत. त्यांच्या तापट स्वभावाचा प्रत्यय अनेकदा आला आहे...

Kbc 14 Jaya Bachchan Get Angry On Amitabh Bachchan Whe He Do Not Pick Up Her Call Reveals | Kbc 14 : पापाराझीच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यावरही भडकतात जया बच्चन, बिग बींनी केला खुलासा

Kbc 14 : पापाराझीच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यावरही भडकतात जया बच्चन, बिग बींनी केला खुलासा

googlenewsNext

 Kbc 14 : चित्रपटात आपल्या भोळ्या व निष्पाप चेहऱ्यानं रिझवणाऱ्या जया बच्चन (Jaya Bachchan) रिअल लाईफमध्ये अतिशय तापट आहेत. त्यांच्या तापट स्वभावाचा प्रत्यय अनेकदा आला आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी जया भडकल्याचे किस्से आहेत.  अनेकदा मीडियावर, सेल्फी घेणाऱ्यांवर जया भडकतात.  संसदेतही त्यांचा ‘अँग्री’ अवतार पाहायला मिळाला.  सन 2017 मध्ये  हेमामालिनीची मुलगी इशा देओल हिच्या  डोहाळ जेवणावेळी जया चक्क भटजींवर संतापल्या होत्या. यानंतर सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांवरही त्या बरसल्या होत्या. ‘डोन्ट डू दिस, स्टुपिड’ अशा शब्दांत त्यांनी एका चाहत्याला सुनावलं होतं. अगदी कुटुंबीयांनाही त्या सोडत नाही. खुद्द त्यांचे पती मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ‘कौन बनेगा करोडपती 14’च्या मंचावर हा खुलासा केला आहे.

कौन बनेगा करोडपती 14’मध्ये हॉट सीटवर बसणारे स्पर्धक अनेकदा अमिताभ यांना त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न करतात. गुजरातेतील भुपेन्द्र चौधरी या स्पर्धकाने अमिताभ यांना असाच एक प्रश्न केला आणि त्याच्या उत्तरादाखल बिग बींनी जया यांच्या स्वभावाबद्दल खुलासा केला. जयाजी तुम्हाला कॉल करतात आणि तुम्ही तो उचलत नाहीत, किंवा मग 3-4 मिस्ड कॉल्स होतात, तेव्हा नेमकं काय घडतं? असा प्रश्न भुपेन्द्र चौधरी यांनी बिग बींना केला.

यावर बिग बीं म्हणाले, ‘यानंतर सर्व पुरूषांची जी अवस्था होते, त्यात मी सुद्धा आहे. तिकडून फोन आला आणि मिस्ड कॉल झाला तर समजून घ्या, तुम्ही संपलात. मी कामात व्यस्त आहे, हे त्यांना माहित नसेल तरच असं घडतं. जयाजींचा फोन आला की, मी तो घेतलाच पाहिजे, असा अलिखित नियम आहे. त्यावर मी एक पर्याय शोधून काढला होता. जयाजींचा फोन आलाच तर माझ्यावतीने तू तो अटेंड करायचा, असं मी माझ्या सेक्रेटरीला सांगितलं. पण यानंतर सगळं उलटच झालं. म्हणजे, मला तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्या सेक्रेटरीकडे जावं लागले, असं जयाजी मला म्हणाल्या...’
 

Web Title: Kbc 14 Jaya Bachchan Get Angry On Amitabh Bachchan Whe He Do Not Pick Up Her Call Reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.