'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. काही प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन सर्वसामान्य व्यक्तींना या शोमध्ये करोडपती होण्याची संधी मिळते. 'केबीसी'च्या हॉट सीटवर बसल्यानंतर भल्याभल्यांची दांडी गूल होते. काही दिवसांपूर्वीच या शोचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या १५व्या सीझनलाही प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
'केबीसी १५'च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात स्पर्धकाला ५० लाखांसाठी वर्ल्डकपबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. राहुल या स्पर्धकाने संदूक राऊंड जिंकत ७० हजारांची रक्कम नावावर केली. त्यानंतर बुद्धी आणि लाइपलाइनची सांगड घालत राहुलने २५ लाखांपर्यंत मजल मारली. पण, ५० लाखांच्या प्रश्नावर त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. राहुलला ५० लाखांसाठी १९८३ वर्ल्ड कपचा प्रश्न विचारण्यात आला होता.
१९८३ क्रिकेट वर्ल्ड कपनंतर कोणत्या पत्रकाराने त्याचे "भारताने वर्ल्ड कपमधून माघार घेतली पाहिजे" हे शब्द मागे घेतले?A. गिदोन हाईB. क्रिस्टोफर मार्टिन-जेनकिंसC. स्किल्ड बेरीD. डेव्हिड फ्रिथ
या प्रश्नाचं योग्य उत्तर D.डेव्हिड फ्रिथ हे आहे. राहुलकडे ५० लाखांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एकही लाइफलाइन नव्हती. त्याला या प्रश्नाचं अचुक उत्तर माहीत नसल्याने त्याला ५० लाखांच्या प्रश्नावर हा खेळ सोडावा लागला.