बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा ‘केसरी’ बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. चित्रपटाने पहिल्याच दिवशी २१ कोटी रूपयांची बक्कळ कमाई केली. अक्षयचा हा चित्रपट सारागढीच्या युद्धावर आधारित असल्याचा दावा केला जातोय. पण जाणकारांचे मानाल तर चित्रपटात अनेक गोष्टी कपोलकल्पित आहेत. ब्रिटीश इंडियन आर्मीच्या ३६ शिख रेजिमेंटमधील १० जवानांच्या सहा ते सात तास चाललेली ही लढाई पडद्यावर रंगवताना अनेक ठिकाणी कल्पनांचा आधार घेण्यात आला आहे.
इशार सिंग एकटा गेला नव्हताचसारागढीवर अभ्यास करणारे कॅप्टन जय सिंह सोहल यांचे मानाल तर, चित्रपटात दाखवल्याप्रमोण हवालदार इशार सिंग याला कधीच एकट्याला पाठवले गेले नव्हते. ‘केसरी’मध्येअक्षय कुमारने हवालदार इशार सिंगची भूमिका साकारली आहे. जय सिंह सोहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८९५ मध्ये संपूर्ण ३६ शिख रेजिमेंटला उत्तर-पश्चिम फ्रंटवर जाण्याचे आदेश दिले गेले होते. ते १८९६ पर्यंत पेशावरमध्ये थांबले. इशार सिंग असाच फिरत फिरत एकट्याने तिथे पोहोचला नव्हता. तर आपल्या पूर्ण टीमसह येथे गेला होता.
केसरी नव्हता पगडीचा रंगअक्षय कुमारने चित्रपटात केसरी रंगाची पगडी घातली आहे. पण जाणकारांचे मानाल तर या पगडीचा रंग केसरी नव्हता. सोहल यांनी केलेल्या दाव्यानुसार, सारागढीचे युद्ध लढणा-या शिख रेजिमेंटच्या पगडीचा रंगही पोशाखाप्रमाणे खाकी होता.
संवादही काल्पनिकजाणकारांच्या मते, सारागढी पोस्टवर लढाईआधी स्थानिक लोकांसाठी मशीद बनवणे आणि लढाईदरम्यान दोन्ही पक्षात झालेली चर्चा निव्वळ काल्पनिक आहे. सोहल यांचे मानाल तर जवानांकडे इतका वेळच नव्हता की, ते मशीद उभारतील. त्यांच्यावर अनेक जबाबदाºया होत्या, ज्या त्यांना पूर्ण करायच्या होत्या.
पठाणांसोबत नव्हती बोलण्याची परवानगीअक्षय कुमार व उर्वरित जवान सर्रास पठाणांसोबत बोलताना चित्रपटात दाखवले आहे. पण तज्ज्ञांचे मानाल तर जवानांना पठाणांशी बोलण्याची परवानगी नव्हती. त्यांना आदेशाचे काटेकोर पालन करावे लागायचे.