ठळक मुद्दे‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होतापहिल्या पाच दिवसात केसरीने ऐकूण ७८.०७ कोटींची कमाई केली आहे
अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राच्याकेसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरु आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्याकेसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली, तसेच यंदाच्या ‘बिगेस्ट ओपनर’ सिनेमांच्या लिस्टमध्ये ‘केसरी’ने पहिले स्थान मिळवले आहे.
‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्याच दिवशी केसरीने २१. ५० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १६.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १८.७५ कोटींचा गल्ला जमावलाय. पहिल्या पाच दिवसात केसरीने ऐकूण ७८.०७ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच केसरी १०० कोटींच्या कल्बमध्ये सहज एंट्री करेल यात काही शंका नाही. केसरीला समीक्षकांची आणि प्रेक्षकांची माऊथ पब्लिसिटी या जोरावर ‘केसरी’कडून बक्कळ कमाईची अपेक्षा केली जात आहे.
‘केसरी’ची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे तर अनुराग सिंहने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अक्षयने यात हवालदार इशार सिंगची भूमिका साकारली आहे. ब्रिटीश इंडियन आर्मीच्या ३६ शिख रेजिमेंटमधील १० जवानांच्या सहा ते सात तास चाललेली ही लढाई पडद्यावर रंगवताना अनेक ठिकाणी कल्पनांचा आधार घेण्यात आला आहे.