Join us

केतकी चितळेची धक्कादायक पोस्ट, अपघाती मृत्यूबद्दल स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 4:41 PM

केतकी ही सोशल मीडियावरील वादग्रस्त भूमिकेमुळे कायम चर्चेत असते.

मराठीमोळी अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे गेल्या काहि महिन्यांपासूनचे समीकरण बनलंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात केतकीला एका प्रकरणात तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर, महिनाभरानंतर जामीन मिळाल्याने केतकीची सुटका झाली. मात्र, केतकी आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. तर, सोशल मीडियावरही तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. काहीजण तिच्या समर्थनार्थही उतरतात. मात्र, केतकीने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन धक्कादायक पोस्ट केली आहे. त्यामध्ये, तिने खून आणि आत्महत्या याबद्दल भाष्य केलंय. 

केतकी ही सोशल मीडियावरील वादग्रस्त भूमिकेमुळे कायम चर्चेत असते. त्यातच, आता तिने सोशल मीडियातून आत्महत्या आणि मर्डर याबद्दल भाष्य करताना तिचा खून होण्याची शक्यता वर्तवली आहे. लोकांना सत्य ऐकायला/वाचायला आवडत नाही कारण ते धोकादायक आहे. सत्य लपवण्यासाठी, खोटे लपवण्यासाठी ते लोकांची हत्या करायलाही तयार असतात, असे तिने म्हटले आहे. 

टीप -जर मी "अपघातात" किंवा "संशयास्पद परिस्थितीत" मरण पावले किंवा "माझ्या गळ्यात फास" किंवा कव्हर-अप "माझ्या औषधांचा ओडी (ओव्हर डोज्ड)"  देण्याचा मार्ग असेल तर हे जाणून घ्या की, तो अपघात किंवा आत्महत्या नसणार आहे, असे म्हणत केतकीने तिची हत्या होणार असल्याचे सूतोवाच केले आहेत.  मी आत्महत्याग्रस्त आहे, होय. पण मी पुन्हा तसा प्रयत्न करणार नाही अशी शपथ घेतली आणि या वेळी आत्महत्या होणार नाही, हे नक्की, असेही तिने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच, माझ्या #truekelfieans जर तुम्ही माझ्या मृत्यूची बातमी वाचली तर त्याचा अर्थ काय ते तुम्हाला माहीत आहे, असेही तिने चाहत्यांना उद्देशून विधान केलंय. 

केतकीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटोसह पोस्ट केलीय. त्यामध्ये, फोटोवरील इमेजमध्येही मजकूर लिहिला आहे. ''मी आजही न्यायासाठी लढत असले तरी मी कायम सत्यच बोलत राहीन. मी जामिनावर बाहेर असले तरी तुम्ही नवीन काही कट रचून माझ्यावर नवीन केसेस लावू शकता (म्हणजे त्यात नवीन काय आहे, तुम्ही गेली 7 वर्षे तेच करत आहात). तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार करू शकता. पण मी थांबणार नाही. गप्प राहून मारण्यापेक्षा सत्य बोलून माझा खून झाला तरी चालेल'' असे केतकीने म्हटलं आहे. त्यामुळे, केतकीच्या मनात नेमकं काय चाललंय हे तर्क लावणे अवघड बनलंय.  

टॅग्स :केतकी चितळेपुणेअपघातइन्स्टाग्राम