बॉलिवूडचा किंग खान म्हणून आज शाहरुख खान (Shahrukh Khan) प्रसिद्ध आहे. देशासह विदेशातही त्याची तुफान क्रेझ आहे. मात्र, या उंचीपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक केतन मेहता यांनी शाहरुखच्या स्ट्रगलविषयी भाष्य केलं आहे. केतन मेहता यांच्या माया मेमसाब हा सिनेमा ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये शाहरुखने मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा करत असताना शाहरुखची आई प्रचंड आजारी होती तरीदेखील त्याने सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं, असं त्यांनी सांगितलं.
केतन मेहता यांनी अलिकडेच 'बॉलिवूड हंगामा'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने शाहरुखच्या स्ट्रगलविषयी भाष्य केलं. "शाहरुखला खरंच सलाम आहे. त्यावेळी त्याची आईची प्रचंड आजारी होती. त्यांची प्रकृती गंभीर होती. सिनेमाचं सगळं युनिट शिमलामध्ये पोहोचलं होतं. मात्र, आईची प्रकृती नाजूक असतानाही शाहरुखने कोणालाही वाट पाहायला लावली नाही. तो शुटिंगसाठी आला. त्याच्यात असलेल्या पॉझिटिव्हीटीसाठी मी मनापासून त्याचे आभार मानतो", असं केतन म्हणाले.
दरम्यान, पहिलाच सिनेमा असल्यामुळे शाहरुखने मनावर दगड ठेवून या सिनेमाचं शुटिंग केलं होतं. मात्र, १९९१ मध्ये त्याच्या आईचं दिल्लीमध्ये निधन झालं. केतन मेहता यांच्या माया मेमसाब या सिनेमातून शाहरुखने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र, आजही दीवाना हा त्याचा डेब्यू सिनेमा मानला जातो.