Shama Bhagat
अभिनेता गोविंदा ‘आ गया हिरो’च्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहे. काही वर्षांपासून गोविंदाचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल करू शकलेले नाहीत. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे सांगताना गोविंदाने पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करण्याचा आशावाद प्रकट केला. आपल्या आयुष्यात आलेल्या चढउतारासंदर्भात आणि करिअरविषयी गोविंदाने मनमोकळ्या गप्पा मारल्या. गेल्या अनेक वर्षांनंतर तू परततोयेस, कसं वाटतंय?-मी आता ‘आ गया हिरो’ या नव्या चित्रपटाकडे पाहतो आहे. सध्या याचे टायटल आम्हाला मिळाले आहे. मला अशी अपेक्षा आहे की हा चित्रपट सुपरहिट होईल. मी आणखी अधिक काम करू शकेन. वयाच्या या वळणावर तू कसा एन्जॉय करतोस?-मी नेहमीच आपले जीवन आनंदी पद्धतीने जगत आलोय. मी खूप परिश्रम घेतो. कठोर परिश्रमास पर्याय नाही, असे माझे मत आहे. मला यापूर्वी फार चांगल्या संधी मिळाल्या नाहीत. काही प्रॉडक्शन हाऊसनी माझ्याशी संपर्क साधला. निर्मात्यांचा काळ आता राहिला नाही. कित्येक वेळा प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली. चित्रपटनिर्मिती ही अतिशय कठीण आणि अवघड गोष्ट झालीय. आता अभिनेतेच निर्माते झाले आहेत आणि त्यांच्या सोयीनुसारच सर्व काही घडत आहे. कामासाठी तू आपल्या मित्रांकडे गेला नाहीस?-मित्र हे नेहमीच मित्र असतात. स्पर्धा, मत्सर हा प्रत्येकाच्या आयुष्याचाच भाग आहे. त्यांना काय करायचे आहे ते करुद्यात. योग्यवेळी काय करावे किंवा नाही, हे मला माहिती नाही. परंतु त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. कृष्णाने दूरचित्रवाणीवर खूप प्रसिद्धी मिळविली. तुला वाटते तो आगामी गोविंदा असेल?-कृष्णाने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तो एका मोठ्या कुटुंबातून आला आहे. त्याची स्वत:ची स्टाईल तयार केली आहे, त्यामुळे तो पुढचा गोविंदा असणार नाही. तो खूप काम करतो. कृष्णा स्ट्रगल करतो आहे, असे मला वाटत नाही. दूरचित्रवाणीवर तो चांगली कामगिरी करतो आहे, त्याने स्वत:चे नाव तयार केले आहे. अमिताभ बच्चन, शाहरूख खान हे देखील दूरचित्रवाणीवर काम करीत आहेत. या ठिकाणी काम करणे सोपे नाही. ते रिअॅलिटी शोमध्येही काम करीत आहेत. तू रिअॅलिटी शोमध्ये का काम करीत नाहीस?-मी काही शो केले. ते प्रसिद्धही झाले. माझे शो प्रमाणापेक्षा चांगले झाले. तुम्ही चॅनलवर काम करू शकत नाही, कारण हे तांत्रिक काम आहे. मी यामागचे गमक ओळखतो आणि त्यापुढे मी गेलो आहे. मी हे करू शकत नाही. तू काही दिवसांपूर्वी म्हणाला, की या उद्योगात काही गट निर्माण झाले आहेत. काम करण्यासाठी तूही असा गट तयार करू इच्छितो?-हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. असे गट जर तयार झाले नसते तर गोविंदा आणि डेव्हिड धवन वेगळे झाले नसते तसेच करण जोहर आणि शाहरूख खान. मी कोणत्याही गटाचा भाग नाही, परंतु मी भविष्य सांगत नाही. देवालाच असे वाटत असेल तर माहिती नाही! आ गया हिरोबाबत काय सांगशील?-या चित्रपटात मी पोलिसाची भूमिका करतो आहे. माझ्यासोबत कोणतीही अभिनेत्री नाही. हा हिरो आपल्या अभिनयाने गुन्ह्यांचा तपास करतो. गेल्या २० वर्षांत तू १०० हून अधिक चित्रपट केले. येणारा शुक्रवार कसा असेल?-मी चित्रपटात काम करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. कोणतीही गोष्ट मी सहज घेत नाही. मी योगा, पूजा, प्राणायाम करतो. मी पार्टीजमध्येही जातो. माझे मित्र, सहकारी यांच्यात वेळ घालवितो. माझी पत्नी सुनीताचे मी नेहमीच आभार मानीन. उद्योगात अनेक बदल झाले. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासंदर्भात तू काय सांगशील?-होय. आम्ही यापूर्वीही थोड्याफार प्रमाणात केले. आता प्रमोशन हा तुमच्या चित्रपटाचा मुख्य भाग राहिला आहे. तुमचे फॅन्स, दर्शक आणि परिणाम यासाठी प्रमोशन महत्त्वाचे आहेत. अनेक जण स्वत:चे आत्मचरित्र लिहीत आहेत. तू असा निर्णय घेतला आहेस?-मी माझे आत्मचरित्र लिहीत नाही. लहान वयात क्रिकेटर त्यांच्या कारकिर्दीबाबत लिहितात. वयाच्या ५५ नंतर मी आयुष्य चांगल्या पद्धतीने जगलोय. कित्येकजण या क्षेत्रात आले. त्यांनीही खूप कष्ट घेतले परंतु यशस्वी झाले नाहीत. माझ्या आईचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी आहे.'आ गया हिरो'सह तू हिरो म्हणून परत येतो आहेस?- नाही! मी अशा पद्धतीची घोषणा करणार नाही. २०१६ साली मी २० वर्षे पूर्ण केलीत. आ गया हिरोने माझे करिअर नव्याने सुरू होत आहे. मी आयुष्यभर परिश्रम घेतले आहेत. या चित्रपटाच्या नावाने मला आणखी कष्ट घ्यावे लागणार आहेत. हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी युवकांना सांगू इच्छितो की, तुमच्या आयुष्याची सुरूवात झीरोने होते तर प्रत्येक मनुष्य त्याच्या आयुष्यात हिरो असतो. बऱ्याच वेळा तो शून्यात जातो, परंतु पुन्हा उभे राहतो. आयुष्य हे कष्ट करणाऱ्यांचे आहे.