पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे चाहत्यांची माफी मागण्याची अक्षय कुमारवर वेळा आल्यामुळे आता KGF स्टार अभिनेता यशने पान मसाल्याच्या कोट्यवधींच्या जाहिरातीची ऑफर नाकारली आहे. अजय देवगण, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर अक्षय कुमारने पान मसाला जाहिरात केली, ज्यामुळे तो सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला. यानंतर अक्षय कुमारने चाहत्यांची माफी मागितली आणि कंपनीसोबतचा हा करार मोडल्याची चर्चा आहे.
यशने करोडोंचा करार नाकारलादरम्यान, KGF-2 सुपरस्टार यशने पान मसाला आणि वेलचीच्या ब्रँडसाठी कोट्यवधी रुपयांची एंडोर्समेंट ऑफर नाकारल्याची बातमी समोर आली आहे. यशसाठी एंडोर्समेंट डील हाताळणारी एजन्सी Exceed Entertainment ने या बातमीला दुजोरा दिला आहे. अर्जुन बॅनर्जी, टॅलेंट अँड न्यू व्हेंचर्स हेड, एक्सीड एंटरटेनमेंट यांनी एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, "पान मसाला आणि अशा उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर खूप हानिकारक परिणाम होतो."
काय झाला निर्णय?ते म्हणाला, 'या गोष्टींच्या वापरामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. खरं तर, यशने घेतलेला हा निर्णय खूपच चांगला आहे, त्याचे चाहते आणि फॉलोवर्सच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. अर्जुन म्हणाला, "देशभरातील त्याची लोकप्रियता पाहता, त्याच्या लोकप्रियतेचा योग्य प्रकारचा संदेश देण्यासाठी आम्हाला उपयोग करून घ्यायचे आहे." चांगल्या गोष्टींचा प्रचार करायचा आहे, असे ते म्हणाले.
यापूर्वी पुष्पा स्टार अल्लू अर्जुननेही पान मसालची जाहिरात करण्यास नकार दिला होता. अल्लूला या जाहिरातीसाठी कोट्यवधींचं मानधन मिळणार होते. चाहत्यांना चुकीचा संदेश देऊ नये या विचाराने अल्लूने ही आकर्षक ऑफर नाकारली होती.