Pathaan Besharam Rang Row : सुमारे चार वर्षांनंतर शाहरूख खान पठाण चित्रपटाद्वारे कमबॅक करतोय. जितकी चर्चा त्याच्या कमबॅकची झाली नाही, तितकी चर्चा या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याची झाली. या चित्रपटात दीपिकाने घातलेली भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद निर्माण झाला. हिंदू संघटनांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. हा धर्माचा अपमान असल्याचं सांगत अनेक हिंदू संघटना याविरोधात रस्त्यावर उतरल्या. अगदी पठाणवर बहिष्कार घालण्याची धमकी देत शाहरूख व दीपिकाचे पुतळे जाळले गेलेत. आता या संपूर्ण वादावर केजीएफ फेम अभिनेता अनंत नाग (Kgf Actor Anant Nag ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एशियानेटला दिलेल्या मुलाखतीत अनंत नाग बोलले. भारतीय सिनेमात महिलांना अशा पद्धतीने दाखवणं बंद व्हायला हवं, हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही,असं ते म्हणाले.
काय म्हणाले अनंत नागमहिलांना याप्रकारे दाखवणं हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. सेन्सॉर बोर्डाने आपलं काम योग्य पद्धतीने केलं असतं तर हा संपूर्ण वादच उपस्थित झाला नसता. चित्रपटांबद्दल विसरा, ओटीटी कन्टेन्ट बघा, त्याठिकाणी सर्रास अश्लील व आक्षेपार्ह कन्टेन्ट दाखवला जातोय. उघडपणे सगळं काही दाखवलं जात आहे आणि त्यांना रोखणारं कुणीही नाहीये. भारतीय सिनेमाला मोठ्या व छोट्या पडद्यावर नग्नता दाखवणं बंद करायला हवं. कारण हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. याचमुळे नाहक वाद उत्पन्न होत आहेत, असं अनंत नाग म्हणाले.
पठाण हा सिनेमा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात जॉन अब्राहम हाही मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरूखने तब्बल चार वर्षानंतर वापसी केली आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.