KGF Chapter 2: साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घालत आहेत. अगदी बॉलिवूडच्या सिनेमांनाही या चित्रपटांनी मागे टाकलं आहे. सुपरस्टार सूर्याचा ‘जयभीम’, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ आणि नुकताच रिलीज झालेला रामचरण व ज्युनिअर एनटीआरचा ‘आरआरआर’ या सिनेमांनी बॉलिवूडला अक्षरश: धूळ चारली. आता आणखी एका साऊथ सुपरस्टारचा सिनेमा येतोय. आम्ही बोलतोय ते साऊथ सुपरस्टार यश (Yash) याच्या ‘केजीएफ 2’ (KGF) या सिनेमाबद्दल. पुढील महिन्यात 14 तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचा पहिला पार्ट रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षक दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अर्थात कोरोना महामारीमुळे हा चित्रपट लांबला. पण लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. तूर्तास या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचीही चर्चा जोरात आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, साऊथ सुपरस्टार यशने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी चार्ज केली आहे. ‘केजीएफ 2’साठी त्याने सुमारे 25 ते 27 कोटी फी घेतली. चित्रपटात यशची हिरोईन बनलेली अभिनेत्री श्रीनिधी हिने या चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी मानधन घेतलं आहे.
या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तने या सिनेमात अधीराची भूमिका साकारली आहे. संजयने या चित्रपटासाठी 9 ते 10 कोटी मानधन घेतल्याचं कळतंय. रवीना टंडन या चित्रपटात रमिका सेनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने 1- 2 कोटी रूपये फी घेतल्याचं कळतंय.
साऊथ व हिंदी सिनेमात झळकलेले ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज ‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये विजयेंद्र इंगलागीची भूमिका साकारत आहेत. त्यांनी यासाठी 80-82 लाख रूपये मानधन घेतल्याचे कळतंय. ‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये मालविका अविनाश या अभिनेत्रीने एका न्यूज चॅनलच्या चीफ एडिटरची भूमिका जिवंत केली आहे. या रोलसाठी तिने 60 ते 62 लाख रूपये घेतल्याची माहिती आहे. अभिनेते अनंत नाग यांनीही त्यांच्या भूमिकेसाठी 50 ते 52 लाख रूपये वसूल केल्याची चर्चा आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ‘केजीएफ 2’साठी 15 ते 20 कोटी फी आकारल्याचा दावा रिपोर्टमध्ये केला जातोय. ‘केजीएफ 2’ हा सर्वात महागडा कन्नड सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय. हा 2018 साली रिलीज झालेल्या ‘केजीएफ- चॅप्टर 1’चा सीक्वल आहे.