ईशान खट्टर आणि अनन्या पांडे या हॉट जोडीच्या 'खाली पिली' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्याने दोघांना सोबत बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. एका मुलगा आणि मुलगी टॅक्सीतून पळून जाण्यापासून या सिनेमाची कथा सुरू होते. टीझरच्या सुरूवातीलाच ईशानच्या पद्धतीने एन्ट्री होते तेव्हाच त्याची भूमिका टपोरी टाइप असल्याचं कळतं.
त्यानंतर टीझरमध्ये एन्ट्री होते सुपर हॉट अनन्या पांडेची. दोघेही काहीतरी गुन्हा करून पोलिसांपासून लपत पळत फिरत आहेत. या क्रिकेटर्स सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या नावाचाही एका डायलॉगमध्ये मजेदार उल्लेख आहे.
दरम्यान, आलिया भट्ट आणि संजय दत्तच्या 'सडक २' च्या ट्रेलरपासून सुरू झालेला डिसलाइक्सचा सिलसिला आताही सुरूच आहे. ईशान आणि अनन्याच्या 'खाली पिली' सिनेमाच्या टीझरलाही यूट्यूबवर डिसलाइक्स अधिक मिळाले आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन मकबूल खानने केलं असून लवकरच या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज होणार आहे.
ईशान याआधी धडक सिनेमात दिसला होता आणि त्यानंतर तो जगप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद मजीदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाउड्स' सिनेमातही दिसला होता. तर दुसरीकडे अनन्या पांडे याआधी दोन सिनेमात दिसली होती. यात 'स्टूडेंट ऑफ दि ईयर 2' आणि 'पति, पत्नी और वो' या सिनेमांचा समावेश आहे.
हे पण वाचा :
Hotness Alert! Disha Patani चा हा बोल्ड अंदाज पाहून वातावरण 'तापलं' फोटो झाले व्हायरल!
पहिल्या सिनेमात सलमान खानसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाले नाही यश, टीचरसोबतचं केलं लग्न
अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!!