Join us
Daily Top 2Weekly Top 5

खतरों के खिलाडी 13: थोडक्यात हुकलं शिव ठाकरेचं जेतेपद; डिनो जेम्स ठरला यंदाच्या पर्वाचा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 09:46 IST

Khatron ke khiladi 13: जाणून घ्या, 'खतरों के खिलाडी'च्या ट्रॉफीशिवाय डिनोला बक्षीस स्वरुपात आणखी काय मिळाली.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेल्या 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाचं १३ वं पर्व नुकतंच पार पडलं आहे. काल या शोचा महाअंतिम सोहळा रंगला आणि यंदाच्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. यंदाच्या पर्वामध्ये डिनो जेम्स याने बाजी मारली असून तो 'खतरों के खिलाडी १३' चा विजेता ठरला आहे. 

डिनो जेम्स यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला असून त्याला २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे. सोबतच ट्रॉफी आणि मारुती स्विफ्ट ही कार सुद्धा त्याला बक्षिसाचं स्वरुप म्हणून देण्यात आलं आहे. तर अरिजीत तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा यांनी टॉप ३मध्ये समानाध मानावं लागलं आहे. तसंच मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा टॉप ५ पर्यंत पोहोचला होता.

हे होते टॉप ५ चे स्पर्धक 

अंतिम फेरीमध्ये ऐश्वर्या शर्मा, डिनो जेम्स, अरिजित तनेजा, रश्मीत कौर आणि शिव ठाकरे यांच्यात ट्रॉफीसाठी काटे की टक्कर पाहायला मिळाली.

हे होते 'खतरों के खिलाडी १३' चे स्पर्धक

यंदाच्या १३ व्या पर्वात अर्चना गौतम, शीझान खान, ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, डेझी शाह, दिनो जेम्स, रोहित रॉय, शिव ठाकरे, रुही चतुर्वेदी, निरा एम बॅनर्जी, सौंदास मौफकीर आणि अरिजित तनेजा या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :खतरों के खिलाडीशीव ठाकरेसेलिब्रिटी