वडिल-मुलीच्या नात्यासारखे दुसरे कोणतेच सर्वोत्तम नाते नाही! एण्ड टीव्हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है' हीच बाब दाखवणार आहे, जेथे मालिकेमध्ये अनिता भाभीचे (नेहा पेंडसे) प्रेमळ वडिल डॅनी शर्मा पाहायला मिळणार आहेत. टेलिव्हिजन दिग्गज व लोकप्रिय अभिनेते अनंग देसाई डॅनीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. टेलिव्हिजन व चित्रपटसृष्टीमध्ये नावलौकिक केलेले अनंग देसाई यांनी बरीच लोकप्रियता मिळवली आहे. ते लवकरच चंचल स्वभावाच्या वडिलांची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे, जे त्यांची मुलगी अनिताला १२ वर्षांनंतर भेटण्यासाठी अमेरिकेमधून येण्यास सज्ज आहेत. ते १२ वर्षांपासून त्यांच्या मुलीसोबत बोलत नाहीत.
अनंग डॅनी शर्माच्या भूमिकेत त्यांच्या व्यक्तिमत्त्व व अंदाजासह प्रेक्षकांना अचंबित करण्यास सज्ज आहेत. प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे, जेथे विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) पहिल्यांदाच त्याच्या सास-याशी आमनासामना करणार आहे. यागामील कारण म्हणजे विभुतीसोबत अनिताने केलेल्या प्रेमविवाहामुळे डॅनीच्या मनात निराशा निर्माण झाली होती आणि त्यांनी दीर्घकाळापासून त्यांचा आक्रोश मनातच ठेवला होता. हे पाहता, त्याला आशा असल्याप्रमाणे त्यांची भेट सुरळीत होईल का की त्यामध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे? मालिकेमधील प्रवेशाबाबत सांगताना अनंग देसाई म्हणाले, ''डॅनी शर्माची भूमिका साकारणे अत्यंत उत्साहवर्धक असणार आहे. ते अमेरिकेत स्थायिक झाला आहेत आणि यशस्वीपणे व्यवसाय चालवत आहेत.
डॅनीचे व्यक्तिमत्त्व अत्यंत विलक्षण व करिष्माई आहे. त्याची मुलगी त्याच्यासाठी सर्वस्व आहे आणि तो तिच्यासाठी व तिच्या आनंदासाठी काहीही करू शकतो. आता त्याने गतकाळातील वाईट आठवणींना विसरून १२ वर्षांनंतर त्याची प्रेमळ मुलगी व तिचा पती विभुतीला भेटण्याचे ठरवले आहे. हे मिलन कसे असेल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे. पुरूष त्यांच्या भाभींना प्रभावित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असण्याच्या गोष्टींचा मी भरपूर आनंद घेतला. ही मालिका पाहण्यासाठी खूपच चांगली आहे आणि मला या मालिकेचा भाग होण्याचा खूप आनंद होत आहे. मी माझ्या या नवीन अवताराप्रती प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास खूपच उत्सुक आहे.''