Join us

श्री व सौ! लग्नाला ७ वर्ष पूर्ण होताच खुशबू तावडेने नवरोबा संग्रामसाठी शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:35 IST

खुशबू तावडेने लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. 

मराठी कलाविश्वात कोणतीही भूमिका अगदी उत्तमरित्या पेलणारी अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे (Khushbu Tawade). सध्या सोशल मीडियावर खुशबू तावडेने शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने ही पोस्ट तिचा लाडका नवरोबा संग्राम साळवीसाठी (Sangram Salvi) केली आहे. मराठी कलाविश्वामध्ये अभिनेता संग्राम साळवी आणि खुशबू तावडे  (khushboo Tawde And Sangram Salvi ) यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी ५ मार्च २०१८ रोजी लग्नगाठ बांधली आणि त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांच्या सुखी संसाराला आज ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सोशल मीडियावर खुशबू तावडेने लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. 

खुशबूने नुकतीच इन्स्टाग्रामवर संग्रामबरोबरचा फोटो शेअर केला आहे. "सात वर्षे पूर्ण झाली आणि असेच कायम सोबत राहू" असं कॅप्शन खुशबूने दिलं. याशिवाय तिनं एक गोड व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे.  दोन्ही पोस्टवर इतर कलाकारांमंडळींसह चाहत्यांनीही खुशबू आणि संग्रामला लग्नाच्या सातव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संग्राम  आणि खुशबू या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

खुशबू तावडे आणि संग्राम साळवी हे दोघं गेल्या वर्षी दुसऱ्यांदा आई-बाबा झालेत. खुशबूने २ ऑक्टोबर २०२४ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'राधी' असं ठेवलं आहे. त्याआधी खुशबू आणि संग्रामला एक मुलगा आहे. त्याचं राघव नाव असून तो आता तीन वर्षांचा आहे. खुशबूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तरी ती 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत दिसत होती. तर संग्राम हा 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. 

टॅग्स :संग्राम साळवीमराठी अभिनेता