Join us

मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

By तेजल गावडे | Updated: October 2, 2024 12:39 IST

Khushboo Tawde and Sangram Salvi : अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांनी नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिली आहे. त्यांना मुलगी झाल्याचे समजते आहे.

अभिनेत्री खुशबू तावडे (Khushaboo Tawde) आणि अभिनेता संग्राम साळवी (Sangram Salvi) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. नुकतेच ते दोघे दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. २ नोव्हेंबर २०२१ रोजी खुशबूने एका गोंडस मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव राघव आहे. 

अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांनी नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिली आहे. त्यांना मुलगी झाल्याचे समजते आहे. खुशबूने ऑगस्ट महिन्यात तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यावेळी ती झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेत काम करत होती. तिने सोशल मीडियावर जाहीर करत मालिकेतूनही निरोप घेतला होता. जवळपास सातव्या महिन्यांपर्यंत तिने मालिकेत काम केले होते. तिने मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी पल्लवी वैद्य पाहायला मिळाली होती.

२०१८ साली खुशबू आणि संग्रामने बांधली लग्नगाठ

अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. २०१८ साली ते विवाहबंधनात अडकले. तर त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिला मुलगा झाला. त्यांच्या या तीन वर्षीय मुलाचे नाव राघव आहे.  

टॅग्स :संग्राम साळवी