जान्हवी कपूर-खुशी कपूर सध्या दोघीही चर्चेत आहेत. जान्हवीने देखील आतापर्यंत एकाच सिनेमात काम केले असले तरी ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. जान्हवीकडे सध्या दोन सिनेमा आहेत. एक करण जोहरचा 'तख्त' तर दुसरा 'गुंजन सक्सेना' यांचा बायोपिक. तर जान्हवीची छोटी बहीण खुशी कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे. जान्हवी आणि खुशीमध्ये नेहमीच जबरदस्त बॉडिंग दिसले आहे.
जान्हवीच्या सिनेमांबाबत बोलायचे झाले तर ती तख्तमध्ये रणवीर सिंह, करीना कपूर, आलिया भट, अनिल कपूर, विक्की कौशल यांच्यसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा सिनेमा मुघल साम्राज्यावर आधारित असल्याने सिनेमातील कलाकारांना ऊर्दू भाषा शिकावी लागणार आहे. यात जान्हवी जैनाब्दी महल ऊर्फ हिराबाई बी भूमिका साकारणार आहे. यासाठी तिलाही ऊर्दू शिकण्यास सांगण्यात आले आहे. जान्हवी आता ऊर्दूचे धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे. तर दुसऱ्या सिनेमात फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांची भूमिका. कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या गुंजन सक्सेना पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैनिकांवर निशाना साधण्यात येत असताना गुंजन यांनी आपल्या जीवाची बाजी लावत त्या भागातून विमान उडवत सैनिकांनी सुरक्षितरित्या त्या भागातून बाहेर काढले होते. अशा शूर महिलेची भूमिका जान्हवी मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.