बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी(Kiara advani)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. कबीर सिंग (kabir singh)चित्रपटानंतर नुकताच तिचा शेरशाह चित्रपट रिलीज झाला. यात तिने डिंपलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. कियारा आडवाणी(Kiara advani)ने २०१४ साली 'फगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरी पहिल्या चित्रपटातून तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. २०१६ मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत 'एमएस धोनी'ःद अनटोल्ड स्टोरी'मध्ये तिने साक्षी रावत ही भूमिका साकारली होती.
यशाचा आलेख वेगाने सर करणाऱ्या कियाराने (Kiara advani) नुकतीच एक ब्रँड न्यू कार खरेदी केली आहे.त्यामुळे तिच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये आणखी एका नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे कियाराने Audi A8L luxury Sedan विकत घेतली आहे. कंपनीने कियाराचे फोटो शेअर केले आहेत ज्यात अभिनेत्री तिच्या ब्रँ़ न्यू ऑडीसोबत दिसते आहे. या आलिशान ऑडी एडिशनची किंमत 1.58 कोटी रुपये आहे.
ऑडीचे हे एडिशन गेल्या वर्षी 2020 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली होती. त्याची सुरुवातीची किंमत 1.56 कोटी (एक्स-शोरूम) आहे. कियाराने तिची नवीन Audi A8L 1.58 कोटी रुपयांच्या किमतीत घरी आणली आहे. कार कंपनीने फोटो ट्विट केले आहेत.
कियाराचे कार कलेक्शनकियाराची ही तिसरी सर्वात महागडी कार आहे. त्याच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये BMW X5 आणि Mercedes-Benz E-Class, BMW 530d यांचा समावेश आहे. तिच्या सर्व कार महागड्या आहेत. कियारापूर्वी करण जोहरने ऑगस्टमध्ये ऑडी A8L देखील खरेदी केली होती. आता हे दोन्ही सेलिब्रिटी ऑडीच्या या नवीन एडिशनचे मालक बनले आहेत.