Join us

Sid Kiara : सिद्धार्थसाठी खूप खास आहेत कियाराचे 'कलीरे', कारण ऐकून तुम्हीही व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 3:14 PM

एका फोटोतील कियाराच्या हातातील कलिऱ्यांकडे सर्वांचे लक्ष गेले. कारण या कलीऱ्यात अतिशय खास गोष्ट लपली आहे ज्याने सर्वच भावूक होतील.

बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Adwani) काल लग्नबंधनात अडकले. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या न्यूली वेड कपलचे फोटो कधी येतात याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले होते. काल रात्री दोघांनी लग्नाचे काही खास फोटो शेअर केले. या सुंदर फोटोंवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. दरम्यान एका फोटोतील कियाराच्या हातातील कलिऱ्यांकडे सर्वांचे लक्ष गेले. कारण या कलीऱ्यात अतिशय खास गोष्ट लपली आहे ज्याने सर्वच भावूक होतील.

कलीऱ्यांवर लपलाय सिद्धार्थच्या फेवरेट पेटचा फोटो

कियाराचा लग्नातील लुक सध्या व्हायरल होत आहे. तिचा ब्रायडल लुक, ज्वेलरी, कलीरे चर्चेचा विषय बनला आहे. मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती. तिने पन्ना आणि हिऱ्याची ज्वेलरी लग्नासाठी सिलेक्ट केली होती. याशिवाय तिच्या कलीराकडे सगळ्यांचेच लक्ष गेले. मृणालिनी चंद्रा यांनी कियाराचे कलीरे डिझाईन केले होते. यामध्ये तिने खास टच दिला होता. कियारा अडवाणीच्या कलीरामध्ये किआरा आणि सिद्धार्थच्या लव्हस्टोरीची झलक मिळते. मृणालिनी चंद्रा यांनी इन्स्टाग्रामवर कलीरांचा क्लोजअप व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सिद्धार्थचा पेट डॉग ऑस्करची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. ऑस्करचा गेल्या वर्षीच मृत्यू झाला. ऑस्कर सिद्धार्थचा लाडका होता. आयुष्यातील अगदी खास दिवशी दोघांनी त्याला सुद्धा आठवणीत ठेवले आहे. 

कियारा आणि सिद्धार्थच्या  शाही विवाह सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर असून हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारे भाडेही खूप आहे. जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो. या पॅलेसमध्ये २५० स्क्वेअर फूट रुममध्ये एक दिवस राहण्यासाठी २० ते ३० हजार रुपये भाडे आकारण्यात येते. या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडे आकारले जाते. त्यानुसार सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :लग्नसिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीसोशल मीडिया