Kiara Advani : कियारा अडवाणीनं कोट्यवधी रुपये खर्च करुन खरेदी केली आलिशान कार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:39 PM2023-05-31T14:39:39+5:302023-05-31T14:41:27+5:30

कियाराकडे आधीपासून अनेक लक्झरी गाड्या आहेत. यात ताफ्यात आणखी एका कारचा समावेश झाला आहे.

kiara advani buys a swanky new car mercedes maybach s580 worth more than 2 crores watch video | Kiara Advani : कियारा अडवाणीनं कोट्यवधी रुपये खर्च करुन खरेदी केली आलिशान कार, व्हिडीओ व्हायरल

Kiara Advani : कियारा अडवाणीनं कोट्यवधी रुपये खर्च करुन खरेदी केली आलिशान कार, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext


कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या स्टाइलपासून ते फॅशन सेन्सपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेत येते. आता कियारा एक वेगळ्या कारणामुळ चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने एक आलिशान खरेदी केली आहे. कियाराकडे आधीपासून अनेक लक्झरी गाड्या आहेत. यात ताफ्यात आणखी एका कारचा समावेश झाला आहे. 

कियारा अडवाणी पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी जपानला गेली होती. दोघेही गेल्या आठवड्यातच मुंबईत परतले आहेत. व्हॅकेशनवरुन परतल्यानंतर अभिनेत्री तिच्या कामात व्यस्त झाली. पापाराझीने मंगळवारी कियारा अडवाणीला मुंबईतील तिच्या डबिंग स्टुडिओबाहेर पाहिले, परंतु यावेळी तिच्या नवीन लक्झरी कारने सर्वांचं लक्ष वेधून घेतले.


विरल भयानीने कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अभिनेत्री एका काळ्या रंगाच्या मर्सिडीज मेबॅक कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. कियाराची कार पापाराझींची नजरेस पडताच त्यांनी अभिनेत्रीचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

कियाराने जी Mercedes-Maybach S580 खरेदी केली आहे तिची किंमत जवळपास २.६९ कोटींच्या घरात आहे. 2021 मध्ये कियारा अडवाणीने एक कार खरेदी केली होती, ज्याची किंमत करोडोंची होती. रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणीची एकूण संपत्ती 32 कोटी रुपये आहे आणि ती एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये फी घेते.
  
 

Web Title: kiara advani buys a swanky new car mercedes maybach s580 worth more than 2 crores watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.