बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री सध्या चर्चेत आहेत. अनेक अभिनेत्री सध्या हिंदी सिनेसृष्टीसोबत साऊथमध्येही चांगलं काम करत आहेत. जान्हवी कपूर, दीपिका पादुकोण, आलिया भट या अभिनेत्री सध्या हिंदी सिनेसृष्टीसोबत टॉलिवूडही गाजवत आहेत. त्यामुळे विविध सिनेमांमध्ये काम करुन या अभिनेत्री सध्या तगडं मानधन घेत आहेत. पण बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकून एका अभिनेत्रीने जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलंय. कोण आहे ही अभिनेत्री?
ही अभिनेत्री ठरली जास्त मानधन घेणारी अभिनेत्रीआलिया, दीपिकाला मागे टाकत मानधनाच्या बाबतीत पुढे गेलेली ही अभिनेत्री आहे कियारा अडवाणी. 'कबीर सिंग', 'जुग जुग जियो' आणि नुकतीच राम चरणसोबत 'गेम चेंजर' सिनेमात दिसलेली अभिनेत्री कियारा साऊथ सुपरस्टार यशसोबत आगामी 'टॉक्सिक' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमासाठी कियाराने तगडं मानधन घेतलं आहे. 'टॉक्सिक'साठी कियाराने तब्बल १५ कोटी रुपयांचं मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये कियारा सहभागी झाली आहे.
२०२५ हे वर्ष फक्त कियाराचंकियारा अडवाणी आणि तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काहीच दिवसांपूर्वी आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली. परंतु यामुळे कियाराला 'डॉन ३' सारखा बिग बजेट सिनेमा सोडावा लागला. परंतु यशसोबत 'टॉक्सिक' सिनेमात काम करुन कियारा पुन्हा एकदा बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. मानधनाच्या बाबतीत सांगायचं तर, प्रियंका चोप्रा सध्या SSMB29 या टॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय. या सिनेमासाठी प्रियंकाने ३० कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तर 'कल्की २८९८ एडी' सिनेमासाठी दीपिकाने २० कोटींचं मानधन घेतलं होतं. याशिवाय सध्या चर्चेत असलेल्या आलिया भट आणि रश्मिका मंदानाच्या यादीत कियारा सहभागी झाली आहे.