Kiara Advani Wished Holi To Sidharth: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत यावर्षीची पहिली होळी साजरी करत आहे. बी-टाऊनच्या सर्वात लाडक्या कपलचा राजस्थानमधील जैसलमेरमध्ये 7 फेब्रुवारीला शाही विवाहसोहळा पार पडला. तेव्हापासून हे कपल चर्चेत आहे. दुसरीकडे, तिच्या पहिल्या होळीच्या दिवशी, मिसेज मल्होत्रा म्हणजेच कियाराने पती सिद्धार्थसोबतचा अनसीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
कियाराने सिद्धार्थ आणि तिचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. हा फोटो त्याच्या हळदी सेरेमनीतील आहे. दोघांनाही हळद लागली त्याक्षणी दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय. हळदी सेरेमनीसाठी कियाराने जरीची नक्षी असलेला लहंगा घातला होता. फोटोत कियाराचा लुक बघण्यासारखा आहे. फोटोत दोघांच्या चेहऱ्यावर हळद लागली दिसत असून दोघेही एकमेकांकडे बघत आहेत. हा फोटो शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्याकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा.
लग्नानंतर कियारा व सिद्धार्थ दिल्लीला रवाना झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदा सासरी पोहोचलेल्या कियाराचं जंगी स्वागत झालं होतं. दिल्लीत कियारा व सिद्धार्थचं लग्नाचं पहिलं रिसेप्शन झालं. यानंतर या जोडप्यानं बॉलिवूडच्या मित्रमंडळींसाठी मुंबईत एक खास रिसेप्शन दिलं. सिद्धार्थ-कियाराच्या शाही लग्नसोहळ्यावर तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोललं जात आहे.